घरमहाराष्ट्रKalyan Crime: इथेच आणायचा होता का महाराष्ट्र माझा? गोळीबार प्रकरणी वडेट्टीवारांचा हल्लाबोल

Kalyan Crime: इथेच आणायचा होता का महाराष्ट्र माझा? गोळीबार प्रकरणी वडेट्टीवारांचा हल्लाबोल

Subscribe

सध्याच्या सरकारमध्ये गुंडप्रवृत्ती पोसली जात आहे. सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटातील आमदारांचा माज काही कमी व्हायचे नाव घेत नाही. इथेच आणायचा होता का महाराष्ट्र माझा?

मुंबई: सध्याच्या सरकारमध्ये गुंडप्रवृत्ती पोसली जात आहे. सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटातील आमदारांचा माज काही कमी व्हायचे नाव घेत नाही. इथेच आणायचा होता का महाराष्ट्र माझा? अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारीनंतर वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. (Kalyan Crime Did you want to bring Maharashtra here Wadettiwar attacks the government in Mahesh Gaikwad firing case)

काय म्हणाले वडेट्टीवार?

सत्ताधारी आमदार जर पोलीस स्टेशनमध्ये कायदाच हातात घेत असतील, तर या राज्यातील जनतेनं कोणाकडे बघायचं? त्यावेळी ते म्हणत होते की, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा आणि तीच वेळ आली आहे, कुठे खड्ड्य़ात घातला महाराष्ट्र माझा, असा प्रश्न उपस्थित वडेट्टीवारांनी उपस्थित केला आहे. वडेट्टीवार म्हणाले की, महायुती सरकारमध्ये असेले शीतयुद्ध आता समोर येत आहेत. जशी निवडणूक जवळ येईल, हे वाद अजून चव्हाट्यावर येतील, असं ते म्हणाले.

- Advertisement -

इथेच आणायचा होता का महाराष्ट्र माझा ?

भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिंदे गटातील माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यात उल्हासनगर इथे पोलीस स्थानकात गोळीबार झाल्याची घटना नुकतीच घडली आहे.

- Advertisement -

सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटातील आमदारांचा माज काही कमी व्हायचे नाव घेत नाही आहे. भाजपवाल्यांचे बॉस “सागर” बंगल्यावर आणि शिंदे गटाचे “बॉस” वर्षा बंगल्यावर बसून आहे. त्यामुळे राज्यातील पोलीस आणि कायदा आपण धाब्यावर बसवून, हा माज नाचवू शकतो हा आत्मविश्वासच दोन्ही पक्षातील आमदार आणि पदाधिकाऱ्यांना आलेला आहे. गृहमंत्र्यांच्या पक्षातील आमदारच पोलीस ठाण्यात गोळीबार करतात..कायदा आणि सुव्यस्थेचे इतके धिंडवडे निघालेला असा आपला महाराष्ट्र कधी नव्हता!

सुसंस्कृत महाराष्ट्राचा महायुतीने युपी, बिहार करून ठेवला आहे. सत्ताधारी आमदार पोलीस स्थानकात गोळीबार करत आहेत. सत्ताधारी आमदार पोलिसांवर हात उचलत आहेत. सत्तेचा माज, बंदूकीचा वापर, बदल्याचे राजकारण या सगळ्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. सरकारच्या मनात नेमकं काय आहे? राज्याला अशांत करून, भीती निर्माण करून राज्य करणे हीच खरी मोदींची गॅरंटी आहे का? असे सवाल उपस्थित करून सरकारने राज्यातली कायदा सुव्यस्था धुळीस मिळविल्याचा हल्लाबोल विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

राजकीय वैमनस्यातून आमदार गणपत गायकवाड यांचा शिंदे गटाच्या कल्याण पूर्वच्या शहरप्रमुखावर गोळीबार झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. यावर वडेट्टीवार यांनी संतप्त प्रतिक्रिया देत सरकारला धारेवर धरले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केली. ते भाजपसोबतसुद्धा गद्दारी करणार आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत महाराष्ट्रात फक्त गुन्हेगार पैदा होतील. महाराष्ट्रात गुंड घडवण्याचे काम मुख्यमंत्री करत आहे. त्यांनी माझे करोडो रुपये खाल्ले, त्यांच्या खासदार मुलाने सगळीकडे भ्रष्टाचार केला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षातील ज्येष्ठ नेत्यांपुढे या सर्व गोष्टी मांडल्या. पण त्यांनी त्यावर काही कारवाई केली नाही. महायुतीतील आमदार गणपत गायकवाड यांचे हे शब्द ऐकून महाराष्ट्रातील जनतेला या अपात्र महायुतीचे भयंकर रूप लक्षात आले असल्याची खरमरीत टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.

वडेट्टीवार म्हणाले की, महाराष्ट्रातील राजकारण विदारक परिस्थितीतून जात आहे. महायुतीत शीतयुद्ध सुरूच आहे. निवडणुका जवळ येतील तसे, यांचे आपापसातील वाद उफाळून येतील. पैसे कमावणे आणि जमीन हडपणे हा भू-माफियांचा उद्योग तेजीत आहे. अशा उद्योगांना राजाश्रय मिळतो हे गंभीर आहे. एकीकडे सरकारने गुंड पोसायचे आणि दुसरीकडे मात्र केंद्रीय तपास यंत्रणा विरोध करणाऱ्यांच्या मागे लावायच्या. सरकारचे हे धंदे आता जनतेच्या लक्षात आले आहेत. त्यामुळे जनता यांना धडा शिकवेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -