घरमहाराष्ट्रकल्याण-डोंबिवलीतील एमआयएम, भाजपच्या नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

कल्याण-डोंबिवलीतील एमआयएम, भाजपच्या नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Subscribe

कल्याण - डोंबिवली महानगरपालिकेतील अपक्ष नगरसेवक कुणाल दिनकरशेठ पाटील, शिवसेनेच्या नगरसेविका उर्मिला गोसावी, भाजपच्या नगरसेविका सुनिता खंडागळे, माजी नगरसेवक फैसल जलास यांनीही राष्ट्रवादीत यावेळी जाहीर प्रवेश केला.

कल्याण-डोंबिवलीचे एमआयएम पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष अयाज गुलजार मौलवी, कल्याण-डोंबिवलीमधील एमआयएम नगरसेवक तन्झिला अयाज मौलवी, ॲड. आर. झेड. हास्मी, अर्शद शब्बीर शेख, मोहम्मद मेहबूब शेख, अकदूस सोहेल सुसे, हरमीत सिंग गुप्ता यांच्यासह १०५ पदाधिकाऱ्यांनी आज गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.

कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेतील अपक्ष नगरसेवक कुणाल दिनकरशेठ पाटील, शिवसेनेच्या नगरसेविका उर्मिला गोसावी, भाजपच्या नगरसेविका सुनिता खंडागळे, माजी नगरसेवक फैसल जलास यांनीही राष्ट्रवादीत यावेळी जाहीर प्रवेश केला. कल्याण ग्रामीणमधील अनेक ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच, उपसरपंच आणि मनसे, युवासेना, आरपीआय, समाजवादी पार्टी व विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचाही यावेळी पक्षप्रवेश झाला.

- Advertisement -

या पक्ष प्रवेशावेळी जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. देशात जे सांप्रदायिक वातावरण तयार होत आहे त्याला थांबवण्यासाठी आपल्याला सर्वांना एकत्र आणण्याची भूमिका स्वीकारावी लागेल. यासाठी कल्याण – डोंबिवलीच्या आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेसोबत युती करण्याचा पक्षाचा विचार आहे. या विचारानुसार सर्वांनी तयारीला लागावे, असे आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केले.

वाढत्या महागाईचा भार सामान्य माणसाच्या खिशावर पडतो याची जाणीव केंद्रसरकारला नाही. याउलट देशाला संविधान देणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला न जुमानण्याची भूमिका आज केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी घेतलेली दिसत आहे. ही भूमिका म्हणजे देशासाठी पहिली धोक्याची घंटा असल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले. तसेच, कल्याण-डोंबिवलीतील आगामी निवडणुकांसाठी माजी आमदार जगन्नाथ शिंदे आणि सुधीर वंडारशेठ पाटील शहरात पक्षाला उभारी देण्यासाठी प्रयत्न करतील, असा विश्वासही जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

यावेळी प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, माजी आमदार जगन्नाथ शिंदे, प्रदेश सरचिटणीस रमेश हनुमंते, ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे, राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे, कल्याण शहराध्यक्ष सुधीर वंडारशेठ पाटील तसेच इतर पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.


हेही वाचा – Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंना पुन्हा पोलीस कोठडी, कोल्हापूर जिल्हा कोर्टाचा निर्णय

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -