Maharashtra Assembly Election 2024
घरठाणेKalyan Fire : कल्याणच्या इमारतीला लागली आग; कारण अद्याप अस्पष्ट

Kalyan Fire : कल्याणच्या इमारतीला लागली आग; कारण अद्याप अस्पष्ट

Subscribe

कल्याण : गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यातून अनेक आगीच्या घटना समोर आलेल्या आहेत. नुकतेच कल्याणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आधारवाडी परिसरात असलेल्या उच्चभ्रू व्हर्टेक्स हाऊसिंग सोसायटीमध्ये एका फ्लॅटला आग लागल्याचे समोर आले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे अद्याप समोर आलेले नाही. पण, आगीमध्ये फ्लॅट पूर्णपणे जळून खाक झाला. या घटनेची माहिती मिळताच केडीएमसी अग्निशमन दलाची गाडी तातडीने घटनास्थळी दाखल झाली. (Kalyan Fire in Building reason not cleared)

हेही वाचा : Raigad News : रायगडमध्ये किती आहे पशुधन, मार्च 2025 आकडेवारी होणार जाहीर 

- Advertisement -

नेमकं काय घडलं?

कल्याणमधील आधारवाडी परिसरात व्हर्टेक्स सोसायटीमध्ये संध्याकाळच्या सुमारास ही आगीची घटना घडली. इमारतीच्या 13 व्या मजल्यावर असलेल्या फ्लॅटला आग लागल्याने रहिवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. ही आग लागल्याचे समजताच वेळीच घरातील सदस्य बाहेर पडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि मोठी दुर्घटना टळली. पण या आगीमध्ये हा संपूर्ण फ्लॅट जळून खाक झाल्याचे समोर आले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कल्याण डोंबिवली अग्निशमन दलाला देण्यात आली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे काम हे युद्ध पातळीवर सुरू आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली? हे अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.

सविस्तर वृत्त लवकरच…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -