Maharashtra Assembly Election 2024
घरठाणेKalyan : शिळफाटा येथे वाहनातून 5 कोटी जप्त

Kalyan : शिळफाटा येथे वाहनातून 5 कोटी जप्त

Subscribe

कल्याण : कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील शिळफाटा येथे शनिवारी एका वाहनातून निवडणूक विभागाच्या स्थिर सर्वेक्षण पथकाने पाच कोटी 55 लाखांची रक्कम जप्त केली. ही रक्कम 10 लाखांपेक्षा अधिक असल्याने ही रक्कम प्राप्तिकर विभागाकडे अधिकच्या चौकशीसाठी दिली आहे, अशी माहिती कल्याण ग्रामीण विधानसभा विभागाचे निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर यांनी माध्यमांना दिली. (Kalyan Shilphata 5 crores seized by Election Commission officer)

हेही वाचा : ibrahim and palak : इब्राहिम आणि पलक मालदिवज वॅकेशनवर 

- Advertisement -

शिळफाटा परिसरात स्थिर सर्वेक्षण विभागाचे एक पथक कार्यरत आहे. हे पथक शनिवारी सकाळी संशयास्पद वाहनांची तपासणी करत होते. त्यावेळी त्यांना एका वाहनाची तपासणी करत असताना त्या वाहनात मोठ्या प्रमाणात रक्कम आढळली. या रकमेची मोजणी केल्यावर ही रक्कम पाच कोटी 55 लाख आढळली. पथकाने ते वाहन बाजूला घेतले. या रकमेबाबत काही अधिकृत कागदपत्रे आपणासोबत आहेत का? अशी विचारणा वाहनातील व्यक्तींना केली. या रकमेबाबत वाहनातील व्यक्ती कोणतीही माहिती निवडणूक पथकाला देऊ शकले नाहीत.

त्यामुळे पथकाने ही माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर यांना कळवली. ही रक्कम संशयास्पद असल्याने ही माहिती प्राप्तिकर विभागाच्या अधिकार्‍यांना कळविण्यात आली. पंचांसमक्ष या रकमेचा पंचनामा करून ही रक्कम प्राप्तिकर अधिकार्‍यांनी अधिकच्या चौकशीसाठी ताब्यात घेतली. निवडणुकीचा अंतीम टप्पा सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणात उलाढाली होण्याची शक्यता विचारत घेऊन निवडणूक पथकांनी जोरदार वाहन तपासणी मोहीम सुरू केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -