Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी भाजपला धक्का, अजित पवारांच्या उपस्थितीत कल्याणराव काळे राष्ट्रवादीत करणार प्रवेश

भाजपला धक्का, अजित पवारांच्या उपस्थितीत कल्याणराव काळे राष्ट्रवादीत करणार प्रवेश

भाजपकडून कल्याणराव काळेंची मनधरणी

Related Story

- Advertisement -

पंढूरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. पोटनिवडणूकीच्या पुर्वीच राजकीय घडामोडींना वेग येताना दिसत आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पोटनिवडणूकीवरुन रस्सीखेच सुरु झाली आहे. या दरम्यान भाजपला मोठा धक्का बसला आहे. कल्याणराव काळे यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. कल्याणराव काळे गुरुवारी अजित पवारांच्या उपस्थित राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. कल्याणराव काळे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची कुरबुर लागल्यानंतर खासदार रणजिसिंह निंबाळकर यांनी सोमवारी काळेंची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच कल्याणराव काळे यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार जे सांगतील त्या प्रमाणे काम करु असे म्हटले होते यामुळे चर्चांना उधाण आले होते. पंढरपूर पोटनिवडणूकीत वर्चस्व प्राप्त करण्यासाठी भाजपही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना फोडण्याचा प्रयत्न करत आहे.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेसाठी राष्ट्रवादीकडून भगिरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भगिरथ भालके हे दिवंगत भारत भालके यांचे पुत्र आहेत. तर भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पोटनिवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे दोन्ही राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. परंतु कल्याणराव काळे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे निश्चित केल्याने भाजपला मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादीला या कल्याणराव काळे यांच्या येण्यामुळे मोठा फायदा होऊ शकतो.

- Advertisement -

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ३० मार्चला पंढरपूर दौऱ्यावर असताना आमदार संजय काळेंची जयंत पाटील यांच्यासोबत भेट घडवून दिली होती. या भेटीमध्येच काळेंच्या पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब करण्यात आला होता. यानंतर आमदार संजय शिंदेंनी बारामतीमध्ये कल्याणराव काळेंची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी भेट घडवून दिली होती. या भेटीमध्ये अजित पवारांना भविष्यात मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

कल्याणराव काळे यांनी लोकसभा निवडणूकीदरम्यान भाजपमध्ये प्रवेश केला होता. प्रवेशाच्या वेळी काळेंना भाजपकडून अनेक गोष्टींसाठी आश्वस्त करण्यात आले होते परंतु कारखान्याच्या आर्थिक मदतीवरुन कल्याणराव काळे भाजपवर नाराज आहेत. तसेच राष्ट्रवादीकडून भविष्यात मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच भाजपमधील मंडळी त्यांना गांभीर्याने घेत नसल्यामुळे कल्याणराव काळे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे.

- Advertisement -