घरCORONA UPDATEकल्याणमधील कुटुंबाची कोरोनावर मात

कल्याणमधील कुटुंबाची कोरोनावर मात

Subscribe

जसलोक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असलेला ३८ वर्षीय व्यक्ती कोरोनामधून पूर्णपणे बरा झाला आहे.

कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना बरे होणारे रुग्ण ही सर्वांसाठी आनंददायी बाब ठरत आहे. जसलोक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असलेला ३८ वर्षीय व्यक्ती कोरोनामधून पूर्णपणे बरा झाला आहे. तसेच त्याची पत्नी आणि मुलगीही कोरोनामुक्त झाले आहेत. कामानिमित्त अमेरिकेला गेलेली ही व्यक्ती मुंबईत परतल्यानंतर त्यांची केलेली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे त्यांचे सर्वच कुटुंब हादरले. कल्याणमध्ये राहत असलेल्या या कुटुंबाने व त्या व्यक्तीच्या कार्यालयातील सहकाऱ्यांनी आपली कोरोना चाचणी करून घेण्यासाठी कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. यामध्ये त्यांची पत्नी आणि तीन वर्षांची लहान मुलीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. तर त्यांची मोठी मुलगी संसर्गापासून वाचली होती. मोठया मुलीच्या सुरक्षेसाठी तिला तातडीने सोलापुरात त्यांच्या गावी पाठविण्यात आले आणि हे कुटुंब कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये दाखल झाले.

परंतु कस्तुरबा हॉस्पिटलमधील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्या व्यक्तीने स्वतः सह कुटुंबाला जसलोक हॉस्पिटलमध्ये हलवण्याची विनंती हॉस्पिटल प्रशासनाकडे केली. विनंती मान्य करत त्या कुटुंबाला जसलोकमधील आयसोलेशन वार्डमध्ये हलण्यास परवानगी देण्यात आली. 10 दिवसांपूर्वी संपूर्ण कुटुंब जसलोकमध्ये हलवण्यात आले. त्याची परिस्थिती नाजूक असल्याने कस्तुरबा हॉस्पिटलमध्येच त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. जसलोकमध्ये त्यांना भरती केल्यानंतर त्यांना यांत्रिक व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. त्याला त्याच्या फुफ्फुसांनी साथ देत चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे अवघ्या 10 दिवसांत ते ठणठणीत झाले. विशेष म्हणजे त्यांची पत्नी आणि मुलगी या दोघी त्यांच्या अगोदर कोरोनामुक्त झाल्या होत्या.

- Advertisement -

कोणत्याही प्रकारचा आजार नाही, धुम्रपानही करत नव्हतो तरीही एका आठवड्यापूर्वी आयुष्यासाठी ज्या परिस्थितीत झगडत होतो यावर विश्वास बसत नाही. परंतु, मला आता बरे वाटत असून पूर्वी इतकाच ठणठणीत आहे. मला नवीन जीवन दिल्याबद्दल मी डॉक्टरांचे आभार कसे आणावेत हेच कळत नसल्याचे त्यांनी हॉस्पिटलमधून बाहेर पडताना सांगितले.

अचूक व्यवस्थापन आणि योग्य उपचार करून रुग्ण कोविड -१९ वर मात करू शकतात. तसेच त्यांनी मानसिकदृष्ट्याही कोरोनावर मात करणे आवश्यक आहे.
– डॉ. ओम श्रीवास्तव, जसलोक हॉस्पिटल

डॉ. श्रीवास्तव म्हणाले की एका वेळेला परिस्थिती भयानक दिसत होती. “ते कस्तुरबा मध्ये व्हेंटिलेटरवर होते. आम्ही त्याला जसलोकमध्ये भरती केले आणि यांत्रिक व्हेंटिलेटरने त्याच्या फुफ्फुसांना साथ दिली. त्यांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला, ”त्या व्यक्तीने सांगितले की त्याच्या कार्यालय आणि वैद्यकीय विम्याने त्याच्या उपचारासाठी १२ लाख रुपये खर्च केला असून त्यातील काही खर्च रुग्णालयाने माफ केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -