कंगना उद्धव ठाकरेंना म्हणाली, जगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्री!

kangana ranaut & CM uddhav thackeray
बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. जगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्री असा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली आहे. तसेच तिने साहिल चौधरीला अटक केल्यानंतर ट्विट करत काँग्रेसला सवाल देखील केला आहे. तर मुंबईत गुंडराज चालू असल्याचा देखील आरोपी कंगनाने केला आहे.

महाराष्ट्र सरकारवर हरयाणातील युट्यूबर साहिल चौधरीने टीका केली होती. याप्रकरणी साहिल चौधरीला अटक केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर कंगनाने टीका केली आहे. कंगनाने ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘मुंबईत हा गुंडाराज चालला आहे? जगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्र्यांना आणि त्याच्या टीमाला कुणीही प्रश्न विचारू शकत नाही? त्यांनी आमच्यासाठी काय केलं? आमचं घरं तोडलं आणि आम्हाला मारलं? यासाठी उत्तरदायी कोण आहे?’, असा सवाल तिने काँग्रेसला केला आहे.

कंगनाला दिलं राऊतांनी उत्तर 

 

कंगनाच्या या ट्विटला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत उत्तर दिलं आहे. संजय राऊत म्हणाले की, ‘कंगना तरुण असून त्यांनी राग व्यक्त केला पाहिजे. तरुणांनी राग मनात दाबला तर त्याचा स्फोट होतो. राग व्यक्त करणं चांगल्या मानसिकतेचे दर्शन आहे. फक्त राग व्यक्त करताना विकृती नको.’


हेही वाचा – ज्यांनी सेनेविरोधात दात उचकटले, त्यांचे दात घशात घालणार – संजय राऊत