Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रKangana Ranaut : 'बटेंगे तो कटेंगे' या घोषणेवर कंगना रणौतने केली टिप्पणी;...

Kangana Ranaut : ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेवर कंगना रणौतने केली टिप्पणी; म्हणाली…

Subscribe

काही दिवसापूर्वी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 'बटेंगे तो कटेंगे' या घोषणा केल्या होत्या. मात्र त्याचे पडसाद आता महाराष्ट्रात पडलेले पण दिसून आले आहे. अशातच हिमाचल प्रदेशमधील भाजपा खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौतने या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिल्याचे समोर आले आहे.

मुंबई : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुका थोड्याच दिवसात पार पडणार आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षाकडून आपल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी राज्यभरात जोरदार प्रचार सुरू आहे. काही दिवसापूर्वी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणा केल्या होत्या. मात्र त्याचे पडसाद आता महाराष्ट्रात पडलेले पण दिसून आले आहे. अशातच हिमाचल प्रदेशमधील भाजपा खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौतने या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिल्याचे समोर आले आहे. एकात्मतेत बळ असते, असे लहानपणापासून वाचत आली आहे, असे कंगनाने म्हटले आहे. तसेच या परिस्थितीला काँग्रेस जबाबदार असल्याचे तिच्या बोलण्यातून लक्षात येते. (kangana ranaut spoke on cm yogi adityanath slogan batenge toh katenge in nagpur.)

हेही वाचा : NCP Sharad Pawar : शरद पवारांच्या खासदारांचा महाविकास आघाडीच्या विजयाचा दावा; विजयी आमदारांचा आकडाच सांगितला

- Advertisement -

भाजपा स्वत: कामाच्या जोरावर जनतेचा विश्वास आत्मसात करत वर आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सत्तेत आमचे सरकार येईल असा विश्वास कंगनाने व्यक्त केला आहे. तसेच व्होट जिहाद आणि बटेंगे तो कटेंगे हे आमचे नाही तर, विरोधकांचे मुद्दे आहेत. जाती-धर्माच्या आधारावर फूट पाडणे हे विरोधकांचे काम आहे.

हेही वाचा : Haryana Crime : शिक्षिकेच्या खुर्चीखाली बॉम्ब ठेवून रिमोटने उडवला, 13 विद्यार्थ्यांवर कारवाई

- Advertisement -

कंगना रणौतने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सहभाग घेतला आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बटेंगे तो कटेंगे या घोषणेवर तिने प्रतिक्रिया दिली आहे. बंटेंगे तो कटेंगे किंवा व्होट जिहाद असे मुद्दे विरोधकांनी उपस्थित केले आहेत. नंतर जेव्हा तिला सांगण्यात आले की ही घोषणा योगी आदित्यनाथ यांची होती, त्यानंतर तिने एकतेची हाक आहे, असे म्हटले आहे. एकता हीच आपली ताकद आहे, असे आपण लहानपणापासून वाचत आलो आहोत, अशी ती म्हणाली आहे. तसेच जोपर्यंत आपण एकत्र आहोत तोपर्यंत आपण सुरक्षित आहोत. जेव्हा आपण विभागले जाऊ तेव्हा आपण असुरक्षित होऊ, असेही ती म्हणाली आहे.


Edited By Komal Pawar Govalkar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -