घरताज्या घडामोडीNitesh Rane : नितेश राणेंचा स्वीय सहाय्यक राकेश परबला पोलीस कोठडी

Nitesh Rane : नितेश राणेंचा स्वीय सहाय्यक राकेश परबला पोलीस कोठडी

Subscribe

शिवसैनिक संतोष परब हल्ल्या प्रकरणी गुन्हा दाखल असलेला संशयित आरोपी राकेश परब काल कणकवली पोलिस स्टेशनमध्ये हजर झाल्यानंतर त्याला अटक करून आज मंगळवारी कणकवली न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यात राकेश परब याला 4 फेब्रुवारी पर्यत 4 दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. आज दुपारी नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर जिल्हा न्यायालयाकडून निकाल अपेक्षित आहे. दुपारी ३ वाजता न्यायालय आपला निकाल जाहीर करणार आहे.

पोलिसांकडून 14 दिवसांच्या पोलिस कोठड़ी ची मागणी

जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर राकेश परब च्या अडचणीत वाढ झाली होती. तदनंतर काल सोमवारी सकाळी राकेश परब कणकवली पोलीस स्टेशन मध्ये पोलिसाना शरण आला . न्यायालयासमोर रिमांड रिपोर्ट मध्ये पोलिसांनी राकेश याच्या 14 दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती. यामध्ये मुख्य संशयित सचिन सातपुते सोबत राकेश परब याचा फोन वरून संवाद झाल्याचे समोर आल्याने त्याचा आयफोन जप्त करणे तसेच आयफोन पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्या साठी वेळ आवश्यक असल्याची मागणी पोलिसांकडून करण्यात आली. तसेच राकेश परब व सचिन सातपुते यांनी पुणे व कोल्हापूर येथे हा कट रचला त्याबाबत तपासासाठी 14 दिवसांची पोलिस कोठड़ी ची मागणी पोलिसांकडून करण्यात आली होती.

- Advertisement -

मात्र राकेश परब यांच्या वतीने युक्तिवाद करताना ऍड. उमेश सावंत यांनी 14 दिवसांच्या पोलिस कस्टडी च्या मागणीला जोरदार आक्षेप घेत हा सर्व प्रकार राजकीय हेतूने प्रेरित असून, संशयित आरोपी राकेश परब हा स्वताहून काल सोमवारी सकाळी कणकवली पोलिसात हजर झाला. असे असताना पोलिसांनी न्यायालयाच्या ही बाब निदर्शनास आणून न देता जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा युक्तिवाद केला. संशयित आरोपी स्वतःहून हजर झालेला असताना काल सोमवारी सायंकाळी 7.30 वाजता आरोपीला अटक दाखवण्यात आली. या गुन्ह्याच्या तपासात जप्त करण्यासारखी काही बाब राहिली नाही असा युक्तिवाद ऍड. उमेश सावंत यांनी केला. त्यावर न्यायालयाने पोलिसांच्या 14 दिवसांच्या कोठडीची मागणी फेटाळत राकेश परब याला तीन दिवसाची पोलिस कोठडी दिली.


 

Nitesh Rane : नितेश राणेंचा स्वीय सहाय्यक राकेश परबला पोलीस कोठडी
Tejasvi Kalsekarhttps://www.mymahanagar.com/author/tejasvi-kalsekar/
तेजस्वी काळसेकर या प्रसारमाध्यम क्षेत्रात गेल्या ५ वर्षांपासून कार्यरत आहे. राजकीय, सामाजिक विषयांवर लिखाण करतात.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -