घरताज्या घडामोडीविरोधकांवरील मोदींच्या 'त्या' टीकेला वकील सिब्बलांचे प्रत्युत्तर; म्हणाले...

विरोधकांवरील मोदींच्या ‘त्या’ टीकेला वकील सिब्बलांचे प्रत्युत्तर; म्हणाले…

Subscribe

काँग्रेस नेते राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर संपूर्ण देशभरात विरोधी पक्षांनी निदर्शने केली. विरोधकांच्या या निदर्शनांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीका केली. 'सर्व भ्रष्टाचारी एकाच व्यासपीठावर आले, असे मोदींनी म्हटले होते. पंतप्रधानांच्या या टीकेला आता ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर संपूर्ण देशभरात विरोधी पक्षांनी निदर्शने केली. विरोधकांच्या या निदर्शनांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीका केली. ‘सर्व भ्रष्टाचारी एकाच व्यासपीठावर आले, असे मोदींनी म्हटले होते. पंतप्रधानांच्या या टीकेला आता ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी प्रत्युत्तर दिले आहे. जेडीयू आणि शिवसेना हे एकेकाळी भाजपचे मित्र होते पण आता तेही भ्रष्ट झाले आहेत, असा सवाल कपिल सिब्बल यांनी केला. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी ट्विट करुन पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. (kapil sibal dig pm modi on his remark all corrupt on one platform)

पंतप्रधान नरेंद्री मोदी यांच्या टीकेला ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. ‘विरोधक घाबरले आहेत आणि सर्व भ्रष्ट एकाच व्यासपीठावर आले आहेत पण मोदीजी, शिवसेना, अकाली दल, जेडीयू, पीडीपी, बसपा हे सर्व पक्ष तुमचे मित्रपक्ष होते आणि तुम्ही त्यांच्यासोबत सरकार स्थापन बनवले होते आता ती भ्रष्ट झाली आहे पण आधी नव्हती का?’, असे ट्वीटमध्ये लिहत कपिल सिब्बल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

- Advertisement -

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर विरोधी पक्षांनी देशभरात निदर्शने केली. यावर देशभरातून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत, दोन दिवसापूर्वी दिल्लीत विरोधी पक्ष एकत्र येत भाजपविरोधात घोषणा दिल्या. काळे झेंडे दाखवत निषेध केला. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला.

नेमके काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी?

- Advertisement -

“आज तपास यंत्रणा चौकशी करत आहे. भ्रष्टाचाऱ्यांची मुळे हादरली आहेत. सर्व भ्रष्टाचारी एकत्र आले आहेत. आम्ही भ्रष्टाचाराविरुद्ध मोहीम सुरू केली, तर काही पक्षांनी भ्रष्टाचार वाचवण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. घटनात्मक संस्थांवर हल्ले होत असून न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते.


हेही वाचा – …मग ‘दीदी ओ दीदी’ म्हणणाऱ्या पंतप्रधानांवर कारवाई का झाली नाही, टीएमसीचा सवाल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -