घरताज्या घडामोडीकर्नाळा बँक घोटाळा: एका माजी आमदारासह एकूण ७६ जणांवर गुन्हा दाखल!

कर्नाळा बँक घोटाळा: एका माजी आमदारासह एकूण ७६ जणांवर गुन्हा दाखल!

Subscribe

कर्नाळा सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी माजी आमदार विवेक पाटील यांच्यासह ७६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कर्नाळा नागरी सहकारी बँकेत केलेल्या ५१२.५० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी शेकापचे नेते, माजी आमदार आणि कर्नाळा बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांच्यासोबत बँकेच्या संचालक मंडळांतील १४ सदस्यांसह एकूण ७६ जणांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये विवेक पाटील यांचे पुत्र अभिजित पाटील यांचाही समावेश आहे. ठेवीदारांना त्यांच्या हक्काचे पैसे परत न देता उलट उत्तरे देणाऱ्या विवेक पाटील यांना या निमिताने जोरदार चपराक मिळाली असून आता त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आली आहे.

बोगस कागदपत्रांच्या आधारे जवळपास ५१२. ५० कोटींचे कर्ज काढल्याप्रकरणी सहकार खात्याच्या तक्रारीवरून सोमवारी (१७ फेब्रुवारी) रात्री तक्रारदार म्हणून जिल्हा विशेष लेखा परिक्षक उमेश गोपिनाथ तुपे यांनी केलेल्या तक्रारीनुसार गुन्हा रजि. नं. ७८ /२०२० भादवि कलम ४०९, ४१७, ४२०, ४६३, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४७७, २०१, १२०(ब), ३४ सह सहकारी संस्था अधिनियम १९६१ कलम. तसेच १४७ सह महाराष्ट्र ठेविदारांचे हितसंबधांचे रक्षण अधिनियम, १९९ चे कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

सर्व कागदपत्रे केली नष्ट 

कर्नाळा बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील, उपाध्यक्ष व संचालक मंडळ तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बँकेचे नियमांचे उल्लंघन करुन आपआपसात संगणमत करून गैरव्यवहार करण्याच्या हेतुने कागदपत्रामध्ये फेरफार केला, कागदपत्रे नष्ट केली, बनावट कागदपत्रे तयार केली. त्याचा सदर कर्ज प्रकरणात वापर करून बँकेचे सभासद, ठेवीदार व शासनाची फसवणूक करून ठेवीदारांनी विश्वासाने ठेवलेल्या ५१२ कोटी ५४ लाख ५३ हजार २८६ रुपये रकमेच्या ठेवींचा अपहार केला. बँकेची आर्थिक स्थिती डबघाईस आणली म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सहकारी संस्थेने तक्रारीत म्हटले आहे. तसेच सन २००८ ते आजपर्यंत विवेक पाटील यांनी बोगस कर्ज प्रकरणातून ५१२ कोटी ५४ लाख ५३ हजार २८६ रुपये अपहार केल्याचे लेखा परिक्षणाच्या अहवालातून उघड झाले असून हा मुद्देमाल अद्याप मिळाला नसल्याचे तक्रारीत नमूद आहे. सदरच्या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षण (प्रशासन) शत्रुघ्न माळी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

ठेवीदारांचे पैसे देण्यास टाळाटाळा

गेल्या सहा महिन्यांपासून कर्नाळा बँकेच्या हजारो ठेवीदारांना व खातेदारांना पैसे मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटाना सामोरे जावे लागत आहे. वारंवार आश्वासने देऊन ठेवीदारांना पैसे परत मिळत नाही. याशिवाय बोगस कागदपत्रांच्या आधारे जवळपास ५१२.५० कोटी कर्ज काढल्याचा ठपका सहकार खात्याने कर्नाळा बँकेवर ठेवला आहे. ठेवीदारांचे पैसे देण्यास विवेक पाटील वारंवार टाळाटाळ करण्याबरोबरच ठेवीदारांना मग्रुमीने उत्तर देत होते. ठेवीदार आणि खातेदारांच्या सहनशीलतेचा अंत झाल्याने याप्रकरणी न्याय मिळावा यासाठी या लोकांनी आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्याकडे धाव घेतली. त्या अनुषंगाने न्याय मिळवून देण्याच्या प्रामाणिक भूमिकेतून प्रसिद्ध लेखापाल किरीट सोमैय्या यांच्या मार्गदर्शनाखाली या दोन्ही लोकप्रतिनिधींनी कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीच्या माध्यमातून सहकार खाते व आरबीआय यांच्याकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. सहकार खात्याबरोबरच पाठपुरावा करीत असताना मागील महिन्यात आरबीआयवर तसेच नुकताच पनवेलमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला होता. याची दखल घेत सहकार खात्याच्या तक्रारीवरून कर्नाळा बँकेचे अध्यक्ष माजी आमदार विवेक पाटील आणि बँकेच्या १४ संचालकांसह एकूण ७६ जणांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

तर अशी वेळ आली नसती

विवेक पाटील यांनी ठेवीदारांना विश्वासात घेऊन वेळेवर पैसे देणे क्रमप्राप्त होते. मात्र त्यांनी तसे न करता आपल्या तोऱ्यात आणि उलटसुलट उत्तरे देत मनमानी केली. सर्वसामान्य ठेवीदारांचे पैसे स्वतःच्या स्वार्थापोटी कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी, कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टमध्ये गिळंकृत न करता पैसे दिले असते तर आज त्यांच्यावर अशी वेळ आली नसती.

आता शेकापची भूमिका काय असणार?

माजी आमदार विवेक पाटील शेकापचे नेते आहेत, त्यामुळे तब्बल ५१२ कोटी रुपयांचा घोटाळा करून पक्षाची रायगडसह महाराष्ट्रात बदनामी करण्याचे काम त्यांनी उघडपणे केले आहे. अनेकदा मोर्चा काढणारा पक्ष म्हणून शेकाप ओळखला गेला पण आता या घोटाळ्याच्या निमित्ताने शेकाप विवेक पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करणार का? या बद्दल शेकापची काय भूमिका असणार याकडे संपूर्ण रायगडसह राज्याचे लक्ष असणार आहे.

कर्नाळा बँक घोटाळाप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेल्या ७६ जणांची नावे

१) विवेकानंद शंकर पाटील
२) सुभाष मधुकर देशपांडे
३) भालचंद्र रामभाऊ तांबोळी
४) मच्छिद्र कृष्णा नाईक
५) विष्णु चिंतु म्हात्रे
६) डॉ. अरिफ युसुफ दाखवे
७) रामचंद्र धोंडू पाटील
८) अभिजीत विवेकानंद पाटील
९) धर्मराज उंदू नाईक
१०) रविंद्र श्रावण चोरघे
११) सदाशिव महादू वाघ
१२) पूनम प्रकाश वाजेकर
१३) शालिनी शंकर ठाणगे
१४) ज्योती नंदु कापसे
१५) हेमंत मुरलीधर सुताणे
१६) मारुती बुधाजी भोपी
१७) प्रमोद बुधाजी भगत
१८) सुरेश आत्माराम ठाकूर
१९) यशवंत काशिनाथ म्हात्रे
२०) भगोरथ पांडुरंग चोरघे
२१) दिपक नरहरी पाटील
२२) राजेंद्र आर. सिंग
२३) गणेश सोमा सावंत
२४)भालचंद्र कचेर पाटील
२५) अतुल लक्ष्मण शेडगे
२६) प्रभाकर मधुकर पाटील
२७) विलास नारायण फडके
२८) गणेश परशुराम गायकर
२९) सुलतान कुरेश सिद्धीकी
३०) सुजीत राजाराम म्हात्रे
३१) महादेव वामन बंडा
३२) अनंता धर्माजी कडू
३३) एकनाथ लहू माळी
३४) अशोक खंडू म्हात्रे
३५) शेखर हरिश्चंद्र कानडे
३६) राजेंद्र कृष्णा पाटील
३७) प्रकाश हरीभाऊ पाटील
३८) दामाजी चांगा शिवकर
३९) विशाल विनायक गावंड
४०) पांडुरंग जयराम तांडेल
४१) गणेश शंकर खुटले
४२) जिवन पांडूरंग गावंड
४३) संतोष हरीभाऊ पाटील
४४) सुरेश गजानन पाटील
४५) शशिकांत सावळाराम पाटील
४६) राजेश पांडूरंग हातमोडे
४७) संदिप भरत पाटील
४८) अशोक गणू गायकर
४९) सुजित लक्ष्मण शेडगे
५०) विशाल विनायक गावंड
५१) सौरभ सुरेश पाटील
५२) विलास दत्तात्रेय गवंडी
५३) ज्ञानेश्वर रामा कोंडीलकर
५४) कृष्णा हिरा पाटील
५५) नरेश किशोर गावंड
५६) प्रशांत मारोती शितकणगे
५७) निलम दत्तात्रय कडू
५८) रविंद्र शांताराम घरत
५९) सिताराम जनार्दन नाखवा
६०) राम गणपत भोईर
६१) रमाकांत काशिनाथ पाटील
६२) अनंता शंकर पवार
६३) रमेश सिताराम मोरे
६४) प्रमोद मायाजी पाटील
६५) अब्दुला अशफाक पिटटु
६६) पुंडलीक परशुराम पाटील
६७) गजानन तुळशीराम पाटील
६८) योगेश काशिनाथ पाटील
६९) रविंद्र श्रावण चोरघे
७०) ज्ञानेश्वर हसुराम मोरे
७१) अनंत शंकर पवार
७२) गोपाळ रामा भगत
७३) सिताराम किसन पाटील
७४) मनोहर चांगु पाटील
७५) गौतम गिरीधर अगा
७६) कलावती जिवन गावंड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -