घरताज्या घडामोडीमहाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्न अस्तित्वातच नाही; बसवराज बोम्मई यांचा मोठा दावा

महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्न अस्तित्वातच नाही; बसवराज बोम्मई यांचा मोठा दावा

Subscribe

महाराष्ट्रातील नेते तेथील समस्यांपासून लोकांचे लक्ष विचलीत करण्यासाठी महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाचा वाद उकरून काढत आहेत, असे बसवराज बोम्मई म्हणाले.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर (maharashtra karnataka border dispute issue ) कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Karnataka CM Basavaraj Bommai ) यांचा मोठा दावा केला आहे. केंद्र सरकारने 1956 साली केलेल्या भाषावार प्रांतरचनेत कन्नड भाषिकांची मोठी संख्या असलेले सोलापूर (Solapur ) अक्कलकोट (Akkalkot ) परिसर महाराष्ट्राला दिला आणि त्याबदल्यात कर्नाटकला बेळगाव मिळाले. त्यामुळे महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्न अस्तित्वातच नसल्याचा दावा कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी केला आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न कधीच संपुष्टात आलाय, असे त्यांनी म्हटलेय. महाराष्ट्रातील नेते तेथील समस्यांपासून लोकांचे लक्ष विचलीत करण्यासाठी महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाचा वाद उकरून काढत आहेत, असेही ते म्हणाले.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी कश्मीर फाईल्स सिनेमा पेक्षा बेळगांव फाईल्स गंभीर आहे. अशा आशयाचे व्यंगचित्र ट्वीट केले होते.

- Advertisement -

भाषिक गळचेपी, लोकशाहीचा खून आणि मराठी तरुणांना दहशतीच्या वातावरणात ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे व्यंगचित्रातून मांडण्यात आले होते. या ट्विटची सर्वत्र जोरदार चर्चा देखील झाली. याच ट्वीटबाबत बंगळुरू येथे पत्रकारांशी बोलताना बोम्मई यांनी हे मोठे विधान केले.

- Advertisement -

सीमाप्रश्नी लवकरच महाराष्ट्राच्या विधीमंडळ अधिवेशनात ठराव संमत होणार असून सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीला गती देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्वपक्षीय शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार आहेत.


हेही वाचा – नारायण राणे, कृपाशंकर सिंहांवरील सोमय्यांच्या आरोपाचे काय झाले?, नाना पटोलेंचा सवाल

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -