घरकर्नाटक विधानसभा निवडणूक २०२३कर्नाटकात जेडीएसमुळे कॉंग्रेसची मुसंडी, आमची मते शाबूत; देवेंद्र फडणवीसांचा दावा

कर्नाटकात जेडीएसमुळे कॉंग्रेसची मुसंडी, आमची मते शाबूत; देवेंद्र फडणवीसांचा दावा

Subscribe

 

साताराः कर्नाटकात जनता दल सेक्युलर पक्षाची (जेडीएस) ५ टक्के मते कमी झाली आहेत. ही मते कॉंग्रेसकडे वळली आहेत. भाजपची मते शाबूत आहेत. भाजपच्या मतांवर काहीही परिणाम झालेला नाही, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

- Advertisement -

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालात कॉंग्रेसला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचे संकेत आहेत. भाजपचा पराभव निश्चित झाला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, २०१८ च्या निवडणुकीत कॉंग्रेसला ३८ टक्के मते होती. त्यावेळी जेडीएसला मिळालेल्या मतांपैकी पाच टक्के मते कॉंग्रेसकडे वळली आहेत. यामुळेच कॉंग्रेसची टक्केवारी वाढली आहे. २०१८ च्या कर्नाटका विधानसभा निवडणुकीत भाजपला जी मते मिळाली होती. तेवढीच मते आताच्या निवडणुकीतही मिळाली आहेत. आमच्या मतांवर काहीही परिणाम झालेला नाही. भाजपची मते शाबूत आहेत, असा दावा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.

कर्नाटक निवडणुकीच्या निकालावर मी काही जणांच्या प्रतिक्रिया बघितल्या. बेगानी शादी मैं अब्दुला दिवाना अशी त्यांची अवस्था झाली आहे. असे अब्दुला मला खूप दिसत आहेत. त्यांना जग पिवळंच दिसत, अशी खोचक टीका उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाकरे गटावर केली.

- Advertisement -

एखाद्या वॉर्डाची पोटनिवडणूक झाली तरी ते टीका करतात. पोटनिवडणुकीत भाजप हरली तरी ते मोदी-शाह हरले अशीच प्रतिक्रिया देत असतात. पण कर्नाटका विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा परिणाम महाराष्ट्र आणि देशावर होणार नाही. केंद्रात मोदी सरकारच निवडून येणार आणि महाराष्ट्रात शिवसेना-भाजपचीच सत्ता येणार आहे. कारण विधानसभा निवडणुकींच्या विजयाचा कधीही केंद्रातील सत्तेतवर परिणाम होत नाही हा इतिहास आहे, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

दुसऱ्यच्या घरी मुलगा झाला म्हणून आनंद करणारी ही लोक आहेत, असा टोला ठाकरे गटाला हाणत उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुंगेरीलाल के हसीन सपने पुरे नही होंगे. कारण आजच उत्तर प्रदेशच्या लोकल बॉडीचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. ज्यांच्या हाती उत्तर प्रदेशची सत्ता असते तेच केंद्रात सत्तेवर येतात. त्यामुळे भाजपला केंद्रात सत्तेत येण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -