घरकर्नाटक विधानसभा निवडणूक २०२३Live Karnataka Election Result : राहुल गांधी म्हणाले – कर्नाटक में नफरत...

Live Karnataka Election Result : राहुल गांधी म्हणाले – कर्नाटक में नफरत का बाजार बंद, मोहब्बत की दुकानें खुलीं

Subscribe

राहुल गांधी म्हणाले – कर्नाटक में नफरत का बाजार बंद, मोहब्बत की दुकानें खुलीं


राहुल गांधी यांची पत्रकार परिषद

- Advertisement -

दिल्लीत सिद्धरामय्या आणि डी.के. शिवकुमार यांना बोलावणार


काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार 1 लाखांनी विजयी

- Advertisement -

माजी मुख्यमंत्री

कर्नाटकात काँग्रेसला बहुमत, भाजपाची सत्ता जाण्याची शक्यता

कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे.

निकालाच्या कलांनुसार, काँग्रेस ११९, जेडीएस २५ तर भाजपा ७२ जागांवर आघाडीवर आहे.

इतर ८ जण आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे.

कर्नाटकात काँग्रेसने सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू केल्या असून अपक्ष ८ उमेदवारांपैकी ५ जण काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात आहेत.


निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळानुसार पक्षनिहाय आघाडी

काँग्रेस – ११८

भाजपा – ७५

जेडीएस – २४

इतर – ०७


आम्हाला सत्तास्थापनेसाठी कुणाची मदत लागणार नाही असं सिद्धरमैय्या म्हणाले होते.

परंतु काँग्रेस कुठलीही जोखीम पत्करायला तयार नाही.

बेळगाव दक्षिण मतदारसंघात महाराष्ट्र एकीकरण समितीचे रमाकांत कोंडूसकर आघाडीवर तर भाजपाचे अभय पाटील पिछाडीवर आहेत.

कनकपुरा मतदारसंघात कर्नाटक काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांची आघाडी

कनकपुरा मतदारसंघात कर्नाटक काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांची आघाडी, भाजपाचा उमेदवार आर. अशोक मागे

मुंबई काँग्रेस दुपारी दोन वाजता जल्लोष करणार

13/5/2023 10:39:26


अथणी मतदारसंघात काँग्रेसचे लक्ष्मण सवदी आघाडीवर

अथणी मतदारसंघातून काँग्रेसचे लक्ष्मण सवदी सध्या आघाडीवर आहेत तर भाजपाचे महेश कुमठळ्ळी पिछाडीवर आहेत.

13/5/2023 10:33:40


सौंदती मतदारसंघातून काँग्रेसचे विश्वास वैघ आघाडीवर

सौंदती मतदारसंघातून भाजपाच्या रत्ना मामणी पिछाडीवर आहेत तर काँग्रेसचे विश्वास वैघ आघाडीवर असल्याचा कल दिसून येत आहे


काँग्रेस नेते जगदीश शेट्टार पिछाडीवर

कर्नाटकात भाजपातून काँग्रेसमध्ये गेलेले जगदीश शेट्टार हुबळी धारवाड मतदारसंघातून पिछाडीवर


कर्नाटकच्या निकालाचे कल पाहता दिल्लीत काँग्रेस कार्यालयाबाहेर आनंदोत्सव


बंगळुरूत मतमोजणी केंद्राबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष


कर्नाटकात काँग्रेसची ११० जागांवर आघाडी

कर्नाटकमध्ये काँग्रेस ११०, भाजपा ७१ तर जेडीएस २३ जागांवर आघाडीवर आहे.

आतापर्यंतच्या आलेल्या कलांमध्ये भाजपाची सत्ता जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

13/5/2023 10:8:31


बेळगाव ग्रामीणमध्ये काँग्रेस उमेदवार आघाडीवर

बेळगाव ग्रामीण मतदारसंघातून काँग्रेसच्या लक्ष्मी हेब्बाळकर सध्या आघाडीवर आहेत तर भाजपाचे नागेश मन्नोळकर पिछाडीवर


कर्नाटकात जेडीएस किंगमेकरच्या भूमिकेत

भाजपा नेते जेडीएसच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती, काँग्रेसला बहुमतसाठी काहीच जागांची आवश्यकता, जेडीएस किंगमेकरच्या भूमिकेत


भाजपाचे नेते जेडीएलच्या संपर्कात असल्याची सुत्रांची माहिती

काँग्रेसच्या उमेदवारांसाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था

कित्तूरमध्ये काँग्रेसचे बाबासाहेब पाटील आघाडीवर

भाजपाचे दोडगौडर पिछाडीवर


काँग्रेसच्या आमदारांना बंगळुरूत बोलावले


कर्नाटकात भाजपाचे 8 कॅबिनेट मंत्री पिछाडीवर


कर्नाटक निवडणूक मतमोजणी सुरूवातीचा कल हाती काँग्रेस आघाडीवर, भाजपा पिछाडीवर

सुरवातीच्या कलांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, काँग्रेस नेते सिद्धरामय्या, डीके शिवकुमार आणि जेडी (एस) चे एचडी कुमारस्वामी यांनी आघाडीवर

सतीश जारकीहोळी, अंजली निंबाळकर, लक्ष्मी हेब्बाळकर, रमेश जारकीहोळी, शशिकला जोल्ले, निखिल कत्ती आघाडीवर

भाजप 81, काँग्रेस 102, जेडीएसनं 15 जागांवर आघाडीवर

काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर; काँग्रेस 100 आणि भाजप 96 जागांवर आघाडीवर


सीमाभागात काँग्रेस ३ जागांवर आघाडीवर


कर्नाटकात काँग्रेसची सेंच्युरी; 100 जागांवर आघाडीवर

आत्तापर्यंत पहिले १८३ निकाल हाती आले आहेत. कलांमध्ये भाजप ७३ आणि काँग्रेसने ९३ जागांवर बाजी मारली आहे. कर्नाटकात काँग्रेसची सेंच्युरी


आकर्नाटकच्या मतमोजणीला सुरुवात;पहिला कल भाजपच्या बाजूने

कर्नाटक मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पोस्टल मतं मोजली जात आहेत. काँग्रेस एक जागेवर आघाडी आहे.


सरकार स्थापन करण्यासाठी 113 जागांची आवश्यकता

विधानसभेत सरकार स्थापन करण्यासाठी किमान 113 जागांची आवश्यकता आहे.

त्यापैकी अनुसूचित जाती (SC) साठी ३६ जागा.

अनुसूचित जमाती (ST) साठी १५ जागा राखीव आहेत.


मात्र आमच्या पक्षाला ५० जागा मिळतीलच; निकालापूर्वी कुमारस्वामींनी व्यक्त केला विश्वास

सिंगापूरला रवाना होण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘‘धजदला (JDS) ५० जागा मिळतील. धजद फार कमी जागांवर जिंकेल, असा अंदाज अनेक सर्वेक्षणांनी वर्तवला आहे; मात्र आमच्या पक्षाला ५० जागा मिळतीलच.’


कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी होणाऱ्या मजमोजणीपूर्वी जल्लोष

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी हुबळी इथल्या हनुमान मंदिराला दिली भेट

काँग्रेसचे जगदीश शेट्टर पिछाडीवर

भाजपमधून शेवटच्या क्षणी त्यांनी काँग्रेसमध्ये केला होता प्रवेश


कर्नाटकात भाजपा 24, काँग्रेस 18, जेडीएस 06 आणि इतर एक

कर्नाटकात भाजपा १४ जागांवर आघाडीवर

पोस्टल मतमोजणीला सुरूवात; एका जागेवर काँग्रेस आघाडीवर

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात


कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज मतमोजणी

कर्नाटकात काँग्रेस बाजी मारणार की भाजप सत्तेत कायम राहणार याचा फैसला अवघ्या काही तासांवर आला आहे.

राज्यभरातील 36 केंद्रांवर सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

कर्नाटकातील 224 जागांसाठी 10 मे रोजी निवडणूक झाली.

कर्नाटकातील निवडणुकीसाठी 72.67 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

विधानसभा निवडणुकीसाठी एकूण 2,615 उमेदवार उभे आहेत.

त्यामध्ये 2,430 पुरुष तर 184 महिला उमेदवार आणि एक तृतीयपंथीय उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

कर्नाटकात 10 मे रोजी मतदान झालं होतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -