घरमहाराष्ट्रद्वेष पसरवणाऱ्यांना कर्नाटकने धडा शिकवला; शरद पवारांचा भाजपवर हल्लाबोल

द्वेष पसरवणाऱ्यांना कर्नाटकने धडा शिकवला; शरद पवारांचा भाजपवर हल्लाबोल

Subscribe

 

अहमदनगरः द्वेष पसरवणाऱ्यांना कर्नाटकने धडा शिकवला आहे. कर्नाटकात होऊ शकतं तर ते देशातील अन्य कोणत्याही राज्यात हे होऊ शकतं. यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवं, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरदर पवार यांनी केले आहे.

- Advertisement -

कर्नाटकात द्वेष पसरवणाऱ्या शक्ती होत्या. या शक्तींचा डाव कर्नाटकच्या जनतेने हाणून पाडला, असा हल्लाबोल शरद पवार यांनी भाजपवर केला. देशात चित्र बदलत आहे. कर्नाटकच्या शपथविधी सोहळ्याला जवळपास एक लाख लोकं आली होती. त्यातले ७० टक्के तरुण होते. सर्व जाती-धर्माचे लोक शपथविधीसाठी आले होते. हे जर कर्नाटकात होऊ शकते तर देशातील कोणत्याही राज्यात हे शक्य आहे, असा दावा शरद पवार यांनी केला.

शरद पवार म्हणाले, कर्नाटकात एक धनगर समाजाचा माणूस मुख्यमंत्री झाला. हे शक्य झालं कारण तेथे कष्टकरी लोकं एकत्र आली. त्यांच्या एकजुटीने सर्वकाही शक्य झाले. कर्नाटकात एकजुट होऊ शकते तर देशातील अन्य कोणत्याही राज्यात तशीच एकजुट होऊ शकते. पण त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवा.

- Advertisement -

अहमदनगर येथे हमाल माथाडी कामगारांच्या २१ व्या अधिवेशानचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी शरद पवार यांनी भाजपवर निशाणा साधला. ऐतिहासिक कामे करणारे अहमदनगर जिह्यात होऊन गेले आहेत. आज ह्याच जिल्हयातील बाजारपेठा दोन दिवस बंद आहेत. जातींमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या शक्ती हे काम करत आहेत. या शक्तींना आपल्याला पराभूत करायचे आहे. तसे केले नाही तर कष्ट करणारा हमाल, गिरणी कामगार उद्धवस्त होईल. एक शुद्र, दुसरा शुद्र असा तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.

काही शक्ती देशाला ५० वर्षे मागे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. सामान्य जनतेत संघर्ष कसा निर्माण होईल याची काळजी घेत आहेत. ज्यांच्या हाती सत्ता आहे ते सत्तेचा दुरुपयोग करत आहेत. जनतेच्या हिताचे निर्णय घेत नाहीत. कष्टकरी, लहान घटकांसाठी सत्तेचा वापर करत नाहीत. केवळ द्वेष पसरवण्याचा प्रयत्न सुरु आहे, अशी टीका शरद पवार यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -