घरमहाराष्ट्रआणखी एका नेत्याचे अश्लील व्हिडिओ व्हायरल

आणखी एका नेत्याचे अश्लील व्हिडिओ व्हायरल

Subscribe

तरुणीला नोकरीच्या निमित्ताने फसवणूक करुन तिच्याशी जवळीक साधून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप रमेश जारकिहोळी यांच्यावर करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात सध्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण चांगलेच गाजत आहे. या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचे नाव आल्याने त्यांनी वनमंत्रीपदाचा राजीनामा देखिल दिला. या सर्व प्रकारामुळे विरोधी पक्षाने संजय राठोड आणि शिवसेनेवर चांगलाच हल्लाबोल केला. मात्र आता भाजपच्या एका मंत्र्याचे एका तरुणीसोबतचे अश्लील व्हिडिओ व्हायरल होत आहेत. बेळगावचे पालकमंत्री आणि कर्नाटकचे जलसंपदामंत्री भाजपचे रमेश जारकीहोळी यांच्या अश्लील व्हिडिओ क्लिप्स सध्या व्हायरल होत आहेत. तरुणीला नोकरीच्या निमित्ताने फसवणूक करुन तिच्याशी जवळीक साधून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप रमेश जारकिहोळी यांच्यावर करण्यात आला आहे. नागरी हक्क संघर्ष समितीने अध्यक्ष दिनेश कलहळ्ळी यांनी हे आरोप रमेश जारकिहोळी यांच्यावर केले आहेत. त्यांनी तरुणीच्या आणि रमेश जारकिहोळी यांच्या अनैतिक संबंधाच्या व्हिडिओ क्लिप्स व्हायरल केल्या आहेत. हे व्हिडिओ एक महिन्यापूर्वीचे असल्याचे समजते. ‘व्हायरल झालेल्या व्हिडिओची चौकशी होऊ द्या. या प्रकरणात चूक असेल तर मला फाशी द्या असे’, असे रमेश जारकीहोळी यांनी म्हटले आहे.

२५ वर्षीय तरुणीला रमेश जारकिहोळी यांनी केपीटीसीएलमध्ये नोकरी देतो असे खोटे आश्वासन दिले आणि नोकरीच्या बाहण्याने तिच्यावर लैगिंक शोषण केल्याचे दिनेश कलहळ्ळी यांनी पोलिसात केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. रमेश जारकीहोळी आपल्याला फसवत असल्याचे तरुणीच्या लक्षात आले. त्यानंतर तिने त्यांच्यातील संबंधाचे व्हिडिओ रेकॉर्ड केले. हे व्हिडिओ व्हायरल केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकीही रमेश यांनी तरुणीला दिली होती. बंगळूरच्या कबॉन पार्क पोलीस स्टेशन येथील एका हॉटेलमध्ये हा प्रकार घडला आहे. तरुणीच्या कुटुंबियांनी दिनेश यांना दिलेल्या माहितीनुसार, तरुणीला व तिच्या कुटुंबियांना मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे तरुणीला संरक्षण देण्यात यावे अशी मागणी दिनेश यांनी केली आहे. त्याचप्रमाणे पोलिसांनी या प्रकरणाची खोलात जाऊन चौकशी करावी अशी मागणी देखिल केली आहे.

- Advertisement -

कोण आहेत रमेश जारकीहोळी?

रमेश जारकिहोळी हे भाजपचे बेळगावचे पालकमंत्री आणि कर्नाटकचे जलसंपदामंत्री आहेत. कर्नाटक राज्यात त्यांचे मोठे नाव आहे. ते पूर्वी काँग्रेस पक्षाचेही नेते होते. कर्नाटकात भाजपची सत्ता येण्यात रमेश जारकीहोळी यांचा मोठा वाटा आहे.


हेही वाचा – ‘तुम्हाला पूर्ण नडून आणि भिडून उरणार’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -