घरताज्या घडामोडीKartiki Ekadashi 2021: एकादशीनिमित्त अजित पवारांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा, टोणगे दाम्पत्य...

Kartiki Ekadashi 2021: एकादशीनिमित्त अजित पवारांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा, टोणगे दाम्पत्य मानाचे वारकरी

Subscribe

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पंढरपुरात कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. यावर्षी नांदेडचे कोंडीबा देवराम टोणगे आणि त्यांच्या पत्नी प्रयागबाई हे दाम्पत्य मानाचे वारकरी ठरले आहे. राज्यात सुख शांती नांदावी आणि वारींची परंपरा कायम सुरु राहावी यासाठी अजित पवारांनी विठ्ठलाकडे साकडे घातले आहे. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्यामुळे २ वर्षानंतर वारकऱ्यांची वारी पंढरपुरात पोहचली आहे. मात्र एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे वारकऱ्यांची गैरसोय झाली आहे.

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमुळे पंढरपुरच्या वारीवर निर्बंध घातले होते. मात्र कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आला असल्यामुळे यंदा वारकऱ्यांना वारीची परवानगी देण्यात आली आहे. अनेक वारकरी पंढरपुरात दाखल झाले असून विठ्ठलाच्या नावाने पंढरी दुमदुमली आहे. विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पहाटे ३ वाजता पार पडली. तर यंदा ३० वर्षांपासून वारी करणाऱ्या टोणगे दाम्पत्याला मानाचे वारकरी ठरले आहेत.

- Advertisement -

मानाचे वारकरी ठरलेले टोणगे दाम्पत्य हे नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील निळा गावचे रहिवासी आहते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पहाटे २.१५ मिनिटांनी विठ्ठलाची षोडशोपचारे पूजा केल्यावर ३ वाजता महापूजा करण्यात आली. उपमुख्यमंत्र्यांसह सोलापूर पालकमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते. कोरोना नियमांच्या अटींचे आणि नियमांचे पालन करुन पूजा करण्यात आली आहे.

- Advertisement -

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्यामुळे वारकऱ्यांवर कडक निर्बंध लादण्यात आले नाही. परंतु गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने वारकरी पंढरपुरात दाखल होत असतात. परंतु एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अनेक वारकऱ्यांना पंढरपुरात दाखल होता आले नाही. तसेच जे वारकरी वारीला आले आहेत त्यांनाही परतीच्या मार्गावर अडचणी येणार आहेत.

जातीय सलोखा राखणे ही आपली परंपरा

त्रिपुरा येथील घटनेमुळे राज्यातील मालेगाव, नांदेड व अमरावती येथे काही घटना घडल्या. अशा प्रकारांमुळे पोलिसांवर ताण पडतो. राज्यातील नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवावर विश्वास ठेवू नये. जातीय सलोखा राखण्याची आपल्या राज्याची परंपरा असून ही परंपरा कायम ठेवण्यासाठी प्रत्येकाने सहकार्य करावे असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

प्रारंभी मानाचे वारकरी कोंडीबा टोणगे आणि सौ प्रयागबाई कोंडीबा टोणगे(मु. निळा, पो. सोनखेड, ता. लोहा, जि. नांदेड) यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर टोणगे यांना राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने देण्यात येणारा प्रवास सवलत पास अजित पवार यांनी सुपूर्द केला. शासकीय महापूजा संपल्यानंतर तात्काळ विठ्ठलाच्या दर्शनास सुरुवात झाली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी,पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, संभाजी शिंदे, अतुलशास्त्री भगरे, शकुंतला नडगिरे, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, प्रांताधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव, पोलीस उप अधीक्षक विक्रम कदम, तहसिलदार सुशील बेल्हेकर, मुख्याधिकारी अरविंद माळी,व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक विलास राठोड आदी उपस्थित होते.


हेही वाचा : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन, महाराष्ट्रावर शोककळा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -