Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र करुणा शर्माचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम १८ सप्टेंबरपर्यंत वाढला

करुणा शर्माचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम १८ सप्टेंबरपर्यंत वाढला

Related Story

- Advertisement -

जातीवाचक शिवागाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या कथित पत्नी करुणा शर्मा यांच्याविरोधात अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामुळे त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र ही न्यायालयीन कोठडी आता १७ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळत न्यायालयीन कोठडी वाढवण्य़ाचा निर्णय घेतला. या प्रकरणावरील पुढील सुनावणी आता १८ सप्टेंबर रोजी होणार आहे. यामुळे करुणा शर्मा यांचा न्यायालयीन कोठडीतील मुक्कात आता वाढला आहे. तपास अधिकारी प्रत्यक्षात हजर नसल्याने ही तारीख वाढवण्यात आली आहे.

करुणा शर्मा यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्यांच्या वकीलांनी जमिनासाठी अंबाजोगाई कोर्टात अर्ज दाखल केला. याच जामिनाच्या अर्जावर आज अंबाजोगाई कोर्टामध्ये सुनावणी पार पडली. मात्र सुनावणी अंती करुणा शर्मा यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय

- Advertisement -

करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आल्याने शर्मा आणि त्यांचा गाडी चालक अरुण दत्तात्रय मोरे यांच्यावर परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. ५ सप्टेंबरला दुपारी शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आली होती.  शर्मा यांच्या गाडीच्या डिक्कीत पिस्तूल ठेवल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. तसेच शर्मा यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता.

परळीत येऊन पत्रकार परिषद घेत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह अनेकांचे खुलासे करणार असल्याचे करुणा शर्मा यांनी फेसबुकवरून जाहीर केले होते. त्यानुसार शर्मा परळीत पोहचल्या. मात्र मुंडे समर्थनांनी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या तालुका संयोगीनी विशाखा घाडगे यांनी ‘जातीवाचक शिवीगाळ का करतेस’ असा जाब विचारल्याने करुणा शर्मा यांनी बेबी छोटूमियां तांबोळी हिला खाली पाडून जखमी केले. तर शर्मांचा गाडी चालक अरुण दत्तात्रय मोरे याने चाकूने पोटावर वार केल्याची फिर्याद घाडगे यांनी दिली होती. यावरुन करुणा शर्मा व दत्तात्रय मोरे या दोघांवर अॅट्रॉसिटीसह जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद झाला.


- Advertisement -

 

- Advertisement -