Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीबाबत नाना पटोलेंचं मोठं विधान; म्हणाले...

कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीबाबत नाना पटोलेंचं मोठं विधान; म्हणाले…

Subscribe

एकीकडे पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र सर्वपक्षियांना विनंती करत आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडी पोटनिवडणुक लढवण्यावर ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पोटनिवडणुकीबाबत मोठं विधान केले आहे.

राज्यातील विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकांनंतर आता सर्व राजकीय पक्षांनी पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीकडे आपला मोर्चा वळवला आहे. एकीकडे पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र सर्वपक्षियांना विनंती करत आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडी पोटनिवडणुक लढवण्यावर ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पोटनिवडणुकीबाबत मोठं विधान केले आहे. (Kasba And Chinchwad By Elections Will Not Be Uncontested Nana Patoles)

काही वेळापूर्वी नाना पटोले यांनी ट्विट करुन कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक लढवणार असल्याचे सांगितले. “पुणे जिल्ह्यातील चिंचवड व कसबा मतदारसंघात विधानसभेची पोटनिवडणूक महाविकास आघाडीचे सर्व घटकपक्ष एकत्रित लढणार आहेत. कसबा मतदारसंघाची जागा काँग्रेस पक्ष आणि चिंचवड मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवणार असल्याचा निर्णय झाला आहे”, असे नाना पटोले यांनी सांगितले.

- Advertisement -

दरम्यान, नाना पटोले यांच्या या ट्विटमुळे कसबा आणि चिंचवड विधानसभा निवडणुका बिनविरोध होणार नाहीत, हे स्पष्ट झालं आहे.

पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवार घोषित केलेले आहेत. हेमंत रासने यांना कसब्यातून भाजपकडून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. तर चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकीत भाजपने दिवंगत मुक्ता टिळक यांच्या कुटुंबाला डावललं आहे.

- Advertisement -

आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे कसबा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. त्यामुळे टिळक कुटुंबातील सदस्यालाच उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती. मात्र भाजपने त्यांच्या जागी हेमंत रासने यांनी उमेदवारी दिली आहे.


हेही वाचा – ‘मोठं राजकारण झालं…’, निवडणुकीनंतर बाळासाहेब थोरातांची पहिली प्रतिक्रिया

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -