घरमहाराष्ट्रपुणेकसबा पोटनिवडणुकीत गिरीश बापट ठरणार किंगमेकर! मैदानात उतरत घेणार जाहीर सभा

कसबा पोटनिवडणुकीत गिरीश बापट ठरणार किंगमेकर! मैदानात उतरत घेणार जाहीर सभा

Subscribe

पुण्यात सध्या कसबा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. ही निवडणुक भाजपने जिंकण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे वरिष्ठ नेते मंडळी पुण्यात तळ ठोकून आहेत. भाजपने प्रचारासाठी सर्व ताकद पणाला लावली आहे. मात्र कसब्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांनी प्रकृती अस्वस्थेमुळे कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र बापट यांनी आपला निर्णय बदलत आता पोटनिवडणुकीच्या प्रचारात उतरणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे कसबा पोटनिवडणुकीत गिरीश बापट यांची भूमिका किंगमेकर ठरणार असल्याची चर्चा आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून कसबा पोटनिवडणुकीवरून भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये वर्चस्वाची लढाई सुरु आहे. त्यामुळे गिरीश बापट आजारापण बाजूला ठेवत पक्षासाठी स्वत: प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत. पुण्यातील नारायण पेठेतील केसरीवाडा येथे गुरुवारी संध्याकाळी 5. वाजता होणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्यात ते सहभागी होणार आहेत. यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये आता नवा उत्साह संचारला आहे.

- Advertisement -

कसबा पोटनिवडणुकीत भाजपचे हेमंत रासने आणि काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यात दुहेरी लढत होणार आहे. गेली अनेक वर्षे कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात भाजपची एकहाती सत्ता आहे. याठिकाणी भाजपकडून ब्राह्मण उमेदवार दिला जातो, मात्र यंदा भाजपने ब्राह्मणेत्तर उमेदवारास उमेदवारी दिल्याने कसबा पेठमधील ब्राह्मण समाज नाराज आहे. या नाराजीमुळे कसबा पोटनिवडणुक भाजपला थोडी कठीण जाणार असल्याची चर्चा आहे. यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कसबा पेठची राजकीय सुत्र हाती घेत पुढीलल रणनीती आखली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी काल गिरीळ बापट यांची भेट घेत त्यांना प्रचारात सहभागी होण्याचे आवाहन केले. यानंतर आता गिरीश बापट यांनी कार्यकर्ता मेळावा जाहीर करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. येत्या २६ तारखेला होणाऱ्या मतदानापूर्वी बापटांचे मार्गदर्शन महत्त्वाचे मानले जात. या मेळाव्यातून गिरीश बापट आता कार्यकर्त्यांना विजयासाठी कोणता सल्ला देणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून आहे.


खासदार अमोल कोल्हेंचा शिवनेरीवरील शिवजन्मोत्सवावर बहिष्कार; ‘या’ गोष्टींवरून सरकारवर व्यक्त केली नाराजी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -