कसब्यातील विजय फक्त रवींद्र धंगेकरांचा, मविआचा नाही – देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, आज कसबापेठ व पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीसह त्रिपुरा, नागालॅंड व मेघालय विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहिर झाला. त्यात भाजपला यश मिळाले आहे. ही २०२४ च्या निवडणुकीची नांदी आहे. तसेच पिंपरी चिंचवडमध्ये आम्हाला यश मिळाले आहे. कसबापेठ येथे २००९ व २०१४ पेक्षा अधिक मते मिळाली आहेत. त्यामुळे तेथील पराभवाचे आम्ही नक्कीच आत्मचिंतन करू, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

You stay in BJP or stay anywhere, action will be taken Fadnavis pointing

मुंबईः कसबा पोटनिवडणुकीतील विजय हा रवींद्र धंगेकरांचा विजय आहे. महाविकास आघाडीचा हा विजय नाही. कारण या निवडणुकीत त्यांनी साधा राहुल गांधी यांचा फोटोही वापरला नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. कसब्यातील पराभवाचं आम्ही आत्मचिंतन करु असंही फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, आज कसबापेठ व पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीसह त्रिपुरा, नागालॅंड व मेघालय विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहिर झाला. त्यात भाजपला यश मिळाले आहे. ही २०२४ च्या निवडणुकीची नांदी आहे. तसेच पिंपरी चिंचवडमध्ये आम्हाला यश मिळाले आहे. कसबापेठ येथे २००९ व २०१४ पेक्षा अधिक मते मिळाली आहेत. त्यामुळे तेथील पराभवाचे आम्ही नक्कीच आत्मचिंतन करू, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

राहुल कलाटे यांच्यामुळे चिंचवडमध्ये नाना काटे यांचा पराभव झाला असा आरोप होत आहे या प्रश्नाचे उत्तर देताना फडणवीस म्हणाले, हिंदू मतांचे विभाजन व्हावे यासाठीच २०१९ मध्ये राहुल कलाटे यांना उमेदवारी देण्यात आली होती. आताही हिंदू मतांचे विभाजन करण्यासाठीच कलाटे हे अपक्ष म्हणून निवडणुकीला उभे राहिले. ही राष्ट्रवादी कॉंग्रेसची खेळी होती. जरी कलाटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला असता तरी आम्हाला ६० टक्के मते मिळालीच असती, असा दावा फडणवीस यांनी केला.

चिंचवडमध्ये अश्विनी जगताप ह्यांना भावनिक मतदान झाले. हा भाजपचा विजय नाही, असा दावा महाविकास आघाडी करत आहे या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, चिंचवड मतदारसंघ हा भाजपचाच आहे. येथील पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी शरद पवार आले होते. उद्धव ठाकरे व अजित पवार यांनीही काटे यांचा प्रचार केला होता. तरीही काटे यांचा पराभव झाला. त्यामुळे जरी त्यांना कसबापेठमध्ये विजय मिळाला असला तरी २०२४ मध्ये तेथेही भाजपचाच उमेदवार निवडून येईल, असा दावा फडणवीस यांनी केला.

उद्धव ठाकरे बोध घेत नाहीत- फडणवीस

४० लोक नाकाखालून निघून जातात तरी उद्धव ठाकरे हे बोध घेत नाहीत. ते कधी बोध घेणार माहीत नाही. पण दुसऱ्याच्या घरात मुलगा झाला म्हणून पेढे वाटणे किती योग्य आहे याचा विचार त्यांनी करायला हवा, अशी टीक फडणवीस यांनी केली.