Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र पुणे "तू अर्ज मागे घे, अन्यथा…"; बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांना धमकी

“तू अर्ज मागे घे, अन्यथा…”; बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांना धमकी

Subscribe

गेल्या काही दिवसांमध्ये रंजक राजकीय घडामोडींमुळे लक्षवेधी ठरत असलेल्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूकीत आता एक नवा ट्वीस्ट आलाय.

गेल्या काही दिवसांमध्ये रंजक राजकीय घडामोडींमुळे लक्षवेधी ठरत असलेल्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूकीत आता एक नवा ट्वीस्ट आलाय. ‘बिग बॉस’ फेम अभिजीच बिचुकले यांनी कसबा विधानसभा मतदार संघातून अपक्ष अर्ज भरला आहे. त्यानंतर आता अभिजीत बिचुकले यांना धमकीचे फोन येऊ लागले आहेत. याबाबत स्वतः अभिजीत बिचुकले यांनी ही माहिती दिलीय. यासंदर्भात अभिजीत बीचुकले यांनी थेट निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहीलं आहे.

कसबा पोटनिवडणुकीत भाजपचे हेमंत रासने विरुद्ध काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यात थेट निवडणूक होणार आहे. कसब्यातून थेट बिग बॉस फेम अभिजीत बिचुकलेही मैदानात उतरल्यांना ही निवडणूक मजेदार ठरणार आहे. काल अपक्ष उमेदवारीचा अर्ज भरल्यानंतर जीवे मारण्याची धमकी आल्याची तक्रार अभिजीत बिचुकले यांनी केलीय. “अर्ज मागे घे आणि पुणे सोडून साताऱ्याला जा आणि असं जर तुम्ही केलं नाही तर तुमचा खून करू…” अशा धमक्या येत असल्याचा दावा अभिजीत बिचुकले यांनी केलाय. बिचुकले यांनी थेट निवडणूक अधिकाऱ्यांना पत्रं लिहून त्याबाबतची तक्रार केली आहे. तसंच आपल्याला तातडीने संरक्षण देण्याचे आदेश संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना देण्याची मागणीही केली आहे.

- Advertisement -

बिचुकले यांनी यापूर्वी राष्ट्रपतीपद, खासदार आणि आमदारकी अशा अनेक निवडणुका लढविल्या आहेत. सर्व प्रकारच्या निवडणुकांमध्ये उमेदवारी अर्ज भरणारे अभिजीत बिचुकले अशी त्यांची ओळख आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतील वरळी मतदारसंघात ते आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध निवडणुकीत उतरले होते.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -