घरमहाराष्ट्रकसबा तो झांकी है महाराष्ट्र अभी बाकी है, राऊतांनी सांगितली मविआची रणनीती

कसबा तो झांकी है महाराष्ट्र अभी बाकी है, राऊतांनी सांगितली मविआची रणनीती

Subscribe

मुंबई – महाविकास आघाडीच्या रवींद्र धंगेकर यांनी कसबा पेठ पोटनिवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवलं. येथे असलेली २० वर्षांची भाजपाची सत्ता उलथवून लावण्यात यश आलं. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी प्रतिस्पर्ध्यांना पुन्हा आव्हान दिलं आहे. कसबा तो झांकी है महाराष्ट्र अभी बाकी है, असं म्हणत त्यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील मविआचं टार्गेट घोषित केलं आहे.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने एकजूट दाखवली तर सत्ता मिळवता येईल, असं संजय राऊत म्हणाले. विधानसभेत २०० पेक्षा जास्त जागा आणि लोकसभेत किमान ४० जागा आम्ही निवडून येईल, असा विश्वास संजय राऊतांनी यावेळी बोलून दाखवला. चिंचवडमध्ये आमची चूक झाली. पण चिंचवडचा विजय भाजपाचा नाही. तिथे वर्षानुवर्षे जगताप पॅटर्न चालतो, हा त्यांचा विजय आहे. चिंचवडमध्ये बंडखोर राहुल कलाटे यांना माघार घ्यायला लावली असती तर तिथे निकाल वेगळा लागला असता, असंही संजय राऊत म्हणाले. पुणेकरांना आमिष दाखवलं गेलं. पण ते आमिषाला बळी पडले नाहीत. त्यामुळे ते कौतुकास पात्र आहेत. कसब्यात घराघरांत पैशांची पाकिटे फेकण्यात आली. पण पुणेकरांनी धनशक्ती लाथाडली. गृहमंत्री, मुख्यमंत्रीसह संपूर्ण कॅबिनेट कसब्यात मंत्रिमंडळाच्या बैठका घेत होतं, पण जनतेने तेसुद्धा नाकारलं. कसबा तो झांकी है महाराष्ट्र अभी बाकी है असं म्हटलं जातंय ते उगीच नाही, असंही ते म्हणाले.

- Advertisement -

दरम्यान, विधिमंडळाला चोरमंडळ म्हटल्याप्रकरणी त्यांनी आज पुन्हा खुलासा केला. मी सरसकट संपूर्ण विधिमंडळाला चोरमंडळ म्हणालेलो नाही. मी विशिष्ट गटातील सदस्यांना चोरमंडळ म्हणालो, असं संजय राऊतांनी स्पष्ट केलं.

देशात बदलाचे वारे – शरद पवार

- Advertisement -

कसबा पेठ हा भाजपाचा पारंपरिक मतदारसंघ होता. भाजपाची तेथील २० वर्षांची सत्ता उलथवून लावण्यात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना यश आलं. यावरून शरद पवारांनी भाजपाला टोला लगावला आहे. ते म्हणाले की, “नागालँडमध्ये राष्ट्रवादीला चांगलं यश मिळालं. आम्ही सात जागांवर निवडून आलो आहोत. असं सांगत असतानाच त्यांनी भाजपावरही निशाणा साधला. पोटनिवडणूक आणि विधानपरिषदेत भाजपाला हवं तसं यश मिळालं नाही. त्यांची सत्ता असूनही ते यशस्वी ठरत नाहीयत. ही गोष्ट आगामी बदलांसाठी अनुकूल आहे. देशात बदलाचे वारे आहेत.” शरद पवारांनी आज सकाळीच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -