घरमहाराष्ट्रकेईएममध्येही कस्तुरबासारखी रक्त तपासणी प्रयोगशाळा

केईएममध्येही कस्तुरबासारखी रक्त तपासणी प्रयोगशाळा

Subscribe

सर्व रुग्णालयांमधील डॉक्टर कस्तुरबात सज्ज,करीनाचा दुसरा बळी ,दिल्लीत ६८ वर्षीय महिलेचा मृत्यू

मुंबईत आतापर्यंत करोना व्हायरसचे ४ रुग्ण कस्तुरबा रुग्णालयाच्या तपासणीत आढळून आल्याने महापालिकेने आता आपल्या प्रमुख रुग्णालयांमधील डॉक्टरांचे पथक कस्तुरबा रुग्णालयात सज्ज ठेवण्याचे निर्देश महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी दिले आहे. विशेष म्हणजे कस्तुरबाच्या धर्तीवर केईएम रुग्णालयामध्येही प्रयोगशाळा निर्माण करण्याचे काम पुढील सात दिवसांमध्ये पूर्ण करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत. करोना व्हायरसच्या या आजाराचा सामना करण्यासाठी आयुक्तांनी आपला आपत्कालिन व्यवस्थापन अधियमावलीतील नियमांचा वापर करण्यास सुरुवात केलली आहे.

करोना व्हायरसचे दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर अन्य दोन अशाप्रकारे एकूण चार करोना व्हायरसचे रुग्ण कस्तुरबा रुग्णालयाच्या तपासणीत आढळून आले. मुंबईकरांसाठी हे भीतीचे वातावरण नसले तरी सुरक्षेच्या उपाययोजना म्हणून मुंबई महापालिका अधिक सतर्क झाली आहे. जागतिक पातळीवर जागतिक आरोग्य संघटनेने करोना व्हायरस च्या आजाराबाबत महामारी घोषित केली आहे. त्यामुळे मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रात कस्तुरबा हे एकमेव रुग्णालय आहे. जिथे करोना व्हायरसची तपासणी होवू शकते. तसेच रुग्णांवर उपचार होवू शकतात. त्यामुळे ही आपत्कालिन परिस्थिती लक्षात घेता महापालिका आयुक्तांनी आरोग्य विभागाला निर्देश देत कस्तुरबा रुग्णालयातील प्रयोगशाळेची क्षमता वाढवून त्याचा स्तर २ वरून ३मध्ये करण्यात यावा,अशी सुचना केली आहे. यासाठी लागणारा सर्व खर्च करण्याचे अधिकारही रुग्णालयाला देण्यात आले आहेत.

- Advertisement -

याशिवाय केईएम रुग्णालयामध्येही कस्तुरबाच्या धर्तीवर प्रयोगशाळा निर्माण करण्यासाठी पावले उचलण्याचेही निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. यासर्व प्रयोगशाळांची क्षमता वाढवण्याच्यादृष्टीकोनातून त्यांचा स्तर ३वर आणण्याचे काम पुढील १ आठवड्यात पूर्ण करण्यात यावे,असेही निर्देश दिले आहेत. कस्तुरबा रुग्णालयात सध्या फक्त ४ डॉक्टर उपलब्ध आहेत. त्यामुळे सर्व रुग्णालयातील डॉक्टर कस्तुरबा रुग्णलयामध्ये तपासणीसाठी उपलब्ध करून घेण्यात यावेत. ही व्यवस्था त्वरीत करण्याचेही निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.

सध्याची आपत्कालिन परिस्थिती लक्षात घेता डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅक्ट २००५ व महापालिका अधिनियम अंतर्गत अत्यंत तातडीची बाब म्हणून ही सर्व कामे करण्यात यावी व त्याकरता निधी खर्च करण्यात यावा,असेही निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.दरम्यान, वांद्रे भाभा, वांद्रे कुर्ला, राजावाडी आणि हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर सेंटरमध्ये प्रत्येकी २५ खाटांचे विलगीकरण कक्ष स्थापन करण्याची प्रक्रीया सुरु आहेत. याशिवाय आता बंद असलेल्या मरोळमधील सेव्हन हिल्स रुग्णालयातही करोना व्हायरसच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी ४०० खाटांचे विलगीकरण कक्ष स्थापन करण्याचीही कार्यवाही सुरु झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -