घरCORONA UPDATEकल्याण डोंबिवलीतही लॉकडाऊन १९ जुलैपर्यंत वाढवला!

कल्याण डोंबिवलीतही लॉकडाऊन १९ जुलैपर्यंत वाढवला!

Subscribe

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत पुणे आणि ठाण्यापाठोपाठ आता कल्याण आणि डोंबिवलीतही लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. डोंबिवलीत कोरोनाचा प्रादु्र्भाव रोखण्यासाठी २ ते १२ जुलैपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. दरम्यान, आता लॉकडाऊन आणखी सात दिवस वाढवण्यात आला आहे. १२ जुलै रोजी सकाळी ७ वाजल्यापासून ते १९ जुलै संध्याकाळी पाच वाजेपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. या कालावधीत अत्यावश्यक सेवा आणि मेडिकल वगळता इतर सर्व बंद राहणार आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यासंदर्भातले आदेश दिले आहेत.

 

- Advertisement -

kdmc lockdown extended

कल्याण-डोंबिवलीमध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक वाढत होते. त्यामुळे २ ते १२ जुलै या कालावाधीत कल्याण डोंबिवलीत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. सकाळी ७ ते १० या वेळेत दुधाची डेअरी, किराणा सामान आणि मेडिकल एवढंच सुरु होतं. मेडिकलची सुरु राहण्याची वेळ संध्याकाळी ७ पर्यंत करण्यात आली होती. दरम्यान आता हा लॉकडाऊन आणखी सात दिवसांनी म्हणजेच १९ जुलैपर्यंत वाढवण्यात आला आहे. शिवाय, आज ठाण्यातही १९ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ठाण्यातला लॉकडाऊन १९ जुलैपर्यंत वाढवला!


 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -