घरमहाराष्ट्रकेडीएमसीचा क्रिडा विभाग बनला हायटेक

केडीएमसीचा क्रिडा विभाग बनला हायटेक

Subscribe

केडीएमसी क्रिडा विभाग बनला हायटेक बनला आहे. या विभागाने विद्यार्थ्यांची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने करण्यास सुरुवात केली आहे. ऑनलाइन पद्धतीमुळे गैरप्रकारांना आळा बसला आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिका ही देशातील पहिली संगणकीय महापालिका म्हणून ओळखली जाते. त्याच काळाची पावले ओळखत पालिकेतील क्रिडा विभागानेही तंत्रज्ञानाची कास धरली आहे. आता महापालिकेतील क्रिडा विभागही हायटेक झाला आहे. पालिकेत जिल्हास्तरीय शालेय स्पर्धांची नोंदणी ऑनलाईन पध्दतीने होत आहे. यंदाच्या वर्षी सुमारे २३ हजार १४६ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. ऑनलाईन पद्धतीमुळे गैरप्रकारांना आळा बसल्याने खेळात पारदर्शकता आली आहे.

ऑनलाइन पध्दतीने सुमारे २३ हजार १४६ विद्यार्थ्यांनी नोंदणी

पालिकेतील क्रिडा अधिकारी आर. के. मुकणे यांनी दोन वर्षांपूर्वी पदभार स्वीकारत हायटेक तंत्राचा वापर करण्यावर भर दिला आहे. २०१८-१९ च्या शैक्षणिक वर्षात जिल्हास्तरावर ५५ खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. ऑनलाइन पध्दतीने सुमारे २३ हजार १४६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यापूर्वी क्रिडाशिक्षकांना शाळेतील प्रत्येक खेळाची सांघिक आणि वैयक्तिक प्रवेशिका भरून घेऊन ती टाईप करावी लागत होती. ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेमुळे शाळांची संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होत आहे. प्रत्येक शाळेतील विद्यार्थी संख्या, त्यातील मुले आणि मुलींची संख्या, खेळातील त्यांचा सांघिक आणि वैयक्तिक सहभाग याची नोंद करता येते. तसेच खेळाडूंची वैयक्तिक आणि सांघिक माहिती मिळाल्याने विद्यार्थ्यांचा नेमका कोणत्या खेळात सहभाग आहे, याची माहिती उपलब्ध हेाते. तसेच खेळाडूंची जन्मतारीख नोंद केल्यानंतर ती कायम राहणार असल्याने, वय कमी करून खेळाडू खेळवण्याच्या प्रकाराला आळा बसणार आहे. खेळाडूचा फोटो असल्याने डमी विद्यार्थी खेळवण्याच्या प्रकाराला चाप बसला आहे. क्रिडा ऑनलाईन झाल्याने विद्यार्थ्यांचा खेळातील सहभागही वाढला आहे, असे क्रिडा शिक्षकांचे म्हणणे आहे.

क्रिडा विभाग ऑनलाईन झाल्याची जिल्हातील ही पहिलीच महापालिका असावी त्यानंतर अनेक महापालिकांनी हायटेक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरूवात केला आहे. ऑनलाईन पद्धतीमुळे गैरप्रकारांना आळा बसला आहे. तसेच प्रत्येक खेळाडूची वैयक्तिक माहितीही वेबसाइटवर सेव्ह राहते. जिल्हास्तरीय खेळांतील सहभागानंतर राज्य व राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू तयार झाले आहेत. तसेच खेळाडूंना ११ वी प्रवेशासाठी कोटा आहे. तसेच नोकरीतही आरक्षण आहे. ऑनलाईनमुळे विद्याथ्यांचा सहभाग वाढला असून, पारदर्शकता आली आहे. तसेच खेळातील पंचांनाही आरटीजेएसच्या माध्यमातून मानधन दिले जाते. ऑनलाईनसाठी पालिका आयुक्त व उपायुक्त यांचे सहकार्य लाभलं आहे.
– आर. के. मुकणे, क्रिडा अधिकारी, केडीएमसी
- Advertisement -

क्रिडामहोत्सवात अडीच हजार खेळाडूंचा सहभाग

केडीएमसीच्या शिक्षण विभागाच्यावतीने बुधवारपासून तीन दिवस आंतरशालेय स्पर्धा सुरू झाल्या आहेत. विविध स्पर्धा प्रकारानुसार क्रिडा महोत्सवात एकूण ८१४ आणि सांघिक स्पर्धात एकूण १७०८ विद्यार्थी आणि विद्यार्थींनी असे एकूण २५२२ खेळाडू सहभागी झाले आहेत. बुधवारी सकाळी महापौर विनिता राणे यांच्या हस्ते क्रिडा स्पर्धांचे उद्घाटन पार पडले. डिसेंबर २०१८ मध्ये पालिकेच्या पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची स्पर्धा घेण्यात आली. त्यांनतर गटस्तरावर पून्हा स्पर्धा झाल्यानंतर आता त्यातील अडीच हजार विजयी खेळाडूंची स्पर्धा होत आहे. या स्पर्धेसाठी सुमारे २४ लाख रूपये खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती मुकणे यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -