घरताज्या घडामोडीएकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर आनंद दिघेंच्या कुटुंबियांकडून प्रतिक्रिया, म्हणाले गद्दारी...

एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर आनंद दिघेंच्या कुटुंबियांकडून प्रतिक्रिया, म्हणाले गद्दारी…

Subscribe

एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आनंद दिघे यांचे कुटुंबीय नाराज आहेत.

Eknath shinde एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे राज्यात भूकंप झाला आहे. ते राजीनामा देण्याची शक्यता असून राज्यात सत्तांतर होण्याची चिन्हे आहेत. त्यातच, एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शिवसेना भावना बाहेर त्यांनी आज प्रसार माध्यमांशी संवाद साधला. (Kedar dighe comment on eknath shinde controversy)

केदार दिघे म्हणाले की, “एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल खंत आहे. दिघे साहेबांची शिकवण असलेल्या नेत्याकडून असं होणं अपेक्षित नाही. दिघे साहेब असते, तर असं घडलंच नसतं. त्यांनी संघटनेशी गद्दारी सहनच केली नसती. एकनाथ शिंदे १०० टक्के चुकले आहेत.”

- Advertisement -

ते पुढे म्हणाले की, “गद्दारांना क्षमा नाही असं दिघे साहेबांचं ब्रीदवाक्य होतं. शिवसेना कोणत्याही नेत्यामुळे नाही तर सर्वसामान्य शिवसैनिकांमुळे घडली आहे. त्यामुळे येथे एखादा नेता नाही राहिला तरी शिवसैनिकांकडे बाळासाहेबांचे, आनंद दिघेंचे विचार, तत्वं आहेत. त्यामुळे शिवसेना यापुढे अधिक जोमाने जाईल.”

हेही वाचा – बाळासाहेब असते तर त्यांनी एकनाथ शिंदेंच्या कानाखाली जाळ काढला असता – अभिजित बिचुकले

- Advertisement -

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी आज ट्विट करून आपली बाजू मांडली होती. यामध्ये त्यांनी आनंद दिघे यांचा उल्लेख केला होता. मात्र या उल्लेखावरूनही केदार दिघे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, “हे ट्वीट करण्याअगोदर मीडियामध्ये त्यांनी ऑफर पाठवल्याची चर्चा होती. भाजपकडे जाऊन उपमुख्यमंत्रीद घ्यावं अशी त्यांची मागणी होती. ही बातमी खरी असेल तर दिघे साहेबांच्या विचाराबाबत कोणी बोलू नये. कारण आपल्या सर्वांना, महाराष्ट्राला आणि भारताला दिघे साहेबांनी संपूर्ण आयुष्य शिवसेनेसाठी त्यागलं होतं हे माहिती आहे. शेवटच्या श्वासापर्यंत ते भगव्याप्रतीच निष्ठावंत राहिले. त्यामुळे याचा आधार घेत कोणी आपली भूमिका मांडू नये”.

 

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -