घरताज्या घडामोडीमहाराष्ट्रात शांतता राखा; मुख्यमंत्री ठाकरेंचं जनतेला आवाहन

महाराष्ट्रात शांतता राखा; मुख्यमंत्री ठाकरेंचं जनतेला आवाहन

Subscribe

या परिस्थितीत तणावाचे वातावरण निर्माण होऊ नये म्हणून महाराष्ट्रातील जनतेने शांतता राखावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केले आहे.

संसदेत नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत गैरसमज आहेत. देशभरात याविरोधात मोर्चे, आंदोलने सुरू असून हिंसाचारही सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत नागरिकांचे गैरसमज दूर करण्याची आवश्यकता आहे. हे काम सर्व पक्षाच्या आमदारांनी आपापल्या मतदारसंघात करायचे आहे. महाराष्ट्र सरकार कोणत्याही समाजाच्या, धर्माच्या नागरिकांच्या हक्कांवर गदा येऊ देणार नाही. लोकशाहीच्या मार्गाने आंदोलने करा, मोर्चे काढा, मुख्यमंत्री म्हणून मला येऊन भेटा, पण राज्याच्या शांततेला गालबोट लागेल असे वर्तन करू नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

सध्या देशभरात सुधारित नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध होत आहे. राज्यातसुद्धा विविध भागांमध्ये या कायद्याला विरोध करण्यासाठी संघटना, विद्यार्थी यांसह आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. या परिस्थितीत राज्यात कायदा सुव्यवस्थेला गालबोट लागेल असे न वागता शांत रहा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले आहे. आवाहन करताना ते पुढे म्हणाले की, “नागरिकत्व कायदा घटनेला अनुसरुन आहे की नाही याबाबत कोर्टाचा निर्णय होणे बाकी आहे. तसेच काहींच्या मनात या कायद्याबाबत भीती आणि गैरसमज आहे. अद्याप कायद्याची अंमलबजावणी झालेली नाही. तरी कायदा अंमलात आला तर देश सोडावा लागेल असे काहींना वाटते. पण मी त्यांना सांगू इच्छितो की अद्याप कायद्याची अंमलबजावणी झालेली नाही. तसेच कोणाच्याही हक्काला आम्ही धक्का बसू देणार नाही. तेव्हा महाराष्ट्रात शांतता राखा.”

हेही वाचा – नागरिकत्व दुरुस्ती कायदा: मराठवाडा पेटला!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -