घरCORONA UPDATEरेड झोनमधील लॉकडाऊन ३ मे नंतरही कायम राहणार?

रेड झोनमधील लॉकडाऊन ३ मे नंतरही कायम राहणार?

Subscribe

मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक यासारख्या शहरी भागात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून रेड झोनमधील लॉकडाऊन ३ मे नंतरही कायम राहणार असल्याची चिन्ह दिसून येत आहेत.

राज्यासह देशात सध्या कोरोनाचे संकट असून मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक यासारख्या शहरी भागात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हीच वाढणारी आकडेवारी सध्या राज्य सरकारची डोकेदुखी ठरत आहे. राज्यात कोरोना रुग्णाची वाढणारी आकडेवारी कमी करण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न होत आहेत. तरी देखील मुंबई, पुणे, ठाण्यासह शहरी भागात सध्या आकडेवारी कमी होत नसल्यानेच रेड झोनमधील लॉकडाऊन ३ मे नंतरही कायम ठेवायचा विचार राज्य सरकार करत असल्याची माहिती मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेत देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या भागात दिवसेंदिवस रुग्ण वाढत असून सरकार सध्या चिंतेत आहे. त्यामुळेच आधीपासूनच रेड झोनमध्ये असलेले मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड, नागपूर हे जिल्हे अजूनही रेडझोनमध्ये असून, येथे आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे.

वाढणारी आकडेवारी ठरतेय डोकेदुखी

दरम्यान, राज्यातील सगळ्यात सर्वाधिक आकडेवारी ही मुंबईत असून, आतापर्यंत कोरोना रुग्णाची आकडेवारी ही ३ हजारहून अधिक झाली आहे. त्यातच प्रभादेवी, वरळी, धारावी या भागात कोरोना रुग्ण सर्वाधिक वाढत आहे. एवढेच नाही तर सोमवारी ५३ पत्रकारांना कोरोनाची लागण झाल्यामुळे मुंबईच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे. तर पुणे, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्याची परिस्थिती देखील वेगळी नाही. त्यामुळे मुंबईसह इतर रेडझोन असलेल्या भागात वाढणारी आकडेवारी सरकारची डोकेदुखी ठरत आहे.

- Advertisement -

राज्यातील रेड, ऑरेंज, ग्रीन झोनचे निकषही बदलले

विशेष म्हणजे राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा आता ५ हजारांच्या वर गेला आहे. त्यामुळे राज्यातील रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनचे निकष देखील बदलण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. या नव्या निकषांनुसार रेड झोन भागात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १५ पेक्षा जास्त असल्याचा निकष कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे, मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड, नागपूर, औरंगाबाद, सांगली हे जिल्हे अजूनही रेड झोनमध्येच आहेत. तर ऑरेंज झोनसाठी रुग्णसंख्येचा निकष बदलून आता दिवसांचा निकष लावण्यात आला आहे. त्यानुसार १४ दिवसांपेक्षा जास्त दिवस कोणत्या जिल्ह्यात एकही नवीन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला नाही, तर तो जिल्हा ऑरेंज झोनमध्ये येतो. तर ग्रीन झोनसाठीचे निकष बदलून इथेही आता दिवसांचा निकष लावण्यात आळा आहे. त्यानुसार ज्या जिल्ह्यांमध्ये सलग २८ दिवस कोरोनाचा कोणताही नवीन रुग्ण सापडला नाही, अशा जिल्ह्यांचा समावेश ग्रीन झोनमध्ये करण्यात आला आहे.


हेही वाचा – LockDown: रेल्वे प्रवाशांना दिलासा; आता घर बसल्या मिळणार तिकिटांचे रिफंड

- Advertisement -

 

एक प्रतिक्रिया

  1. Butibori madhil companies kevha pasun suru honar.
    Aamhi tya companies madhye kaam karto.
    Mag Khali divsanchi salary milel ka ?

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -