घरCORONA UPDATECoronavirus : केईएम, सायनमधील डॉक्टर, परिचारिकेला कोरोनाची लागण

Coronavirus : केईएम, सायनमधील डॉक्टर, परिचारिकेला कोरोनाची लागण

Subscribe

केईएममध्ये दोन डॉक्टर व एका परिचारिकेला तर सायन हॉस्पिटलमध्ये एका डॉक्टर व एका परिचारिकेला कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे.

रुग्णांवर उपचार करत असताना डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत असल्याचे दिसून येत असताना आता केईएम आणि सायन हॉस्पिटलमधील डॉक्टर व परिचारिकांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. केईएममध्ये दोन डॉक्टर व एका परिचारिकेला तर सायन हॉस्पिटलमध्ये एका डॉक्टर व एका परिचारिकेला कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. केईएम हॉस्पिटलमधील दोन निवासी डॉक्टर व एका परिचारिकेला कोरोनाची लागण झाल्याचे सोमवारी रात्री आलेल्या अहवालातून स्पष्ट झाले. हे तिघेही कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्याने त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोरोनाची लागण झालेल्या डॉक्टरांपैकी एक जण केईएमच्या स्क्रिनींग ओपीडीमध्ये कार्यरत होता. हा २६ वर्षीय डॉक्टर कस्तुरबा हॉस्पिटलमधील कोव्हिड -१९ च्या ड्यूटीवर होते. त्यानंतर, केईएममध्ये सुरु केलेल्या स्क्रिनींग ओपीडीमध्ये काम करत होते. तर काही दिवसांपूर्वी वरळीमध्ये राहत असलेल्या केईएममधील पॅथॉलॉजी तंत्रज्ञाच्या संपर्कात आल्याने ईएमएस पॅथ लॅबमध्ये ड्युटीवर असलेल्या २५ वर्षीय डॉक्टरला कोरोनाची लागण झाली. तसेच नुकतेच मूत्रपिंड प्रत्यारोपण केल्यानंतर कोरोनाची लागण झालेल्या केईएममधील सहायक वैद्यकीय अधिकारी असलेल्या डॉक्टरच्या संपर्कात आल्याने परिचारिकेला कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले. कोरोनाची लागण झालेल्यांपैकी स्क्रिनींग ओपीडीमध्ये कार्यरत असलेल्या डॉक्टरला कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये तर पॅथ लॅबमधील डॉक्टर व परिचारिकेला सेव्हन हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. या तीन रुग्णांमुळे केईएममधील कोरोनाबाधितांचा आकडा पाचवर पोहचला आहे.

- Advertisement -

दरम्यान, १० दिवसांपूर्वी कोरोनाबाधित सापडलेला सहायक वैद्यकीय अधिकारी असलेल्या डॉक्टरची दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती केईएम हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली. त्याचप्रमाणे सायन हॉस्पिटलमधील एक डॉक्टर व एका परिचारिकेला कोरोनाची लागण झाल्याचे सोमवारी रात्री आलेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. या दोघांनाही हॉस्पिटलमध्येच क्वारंटाईन करून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आल्याची माहिती सायन हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिली. दरम्यान सायन हॉस्पिटलमध्ये यापूर्वीही एका डॉक्टर व एका परिचारिकेला कोरोनाची लागण झाल्याने कोरोनाबाधितांचा आकडा चारवर गेला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -