Ketaki Chitale: केतकी चितळे विरोधात संत तुकाराम महाराज संस्थानकडून तक्रार दाखल करण्याची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेला अडचणींचा सामना करावा लागतोय. केतकी सध्या पोलीसांच्या ताब्यात असून तिला 18 मे पर्यंत पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, केतकी विरोधात आता संत तुकाराम महाराज संस्थानने देखील तक्रार दाखल केलीये. केतकीने फेसबुकवर जी पोस्ट शेअर केली होती त्या कवितमध्ये तुका म्हणे असा उल्लेख करुन वादग्रस्त आणि विडंबनात्मक लेखन करण्यात आलंय.  यामुळे संत तुकाराम महाराज संस्थानाने देखील केतकीला विरोध दर्शवला आहे.

‘तुका म्हणे’ ही संत तुकाराम महाराजांची नाममुद्रा असून संत तुकाराम महाराजांनी लिहिलेल्या सर्व अभंगाची स्वाक्षरी आहे. याचा चुकीच्या पद्धतीने वापर करण्यता आलाय. कोणत्याही संताचा नावाचा वापर गैरप्रकारे केला गेला तर तो खपवून घेतला जाणार नाही. यापुढे अशी कोणीचं असं धाडसं करु नये यासाठी केतकी चितळेवर गुन्हा दाखल करावा अशी तक्रार संत तुकाराम महाराज संस्थानने केलीये. यासह कायदेशीर कारवाईची मागणी केलीये.

नेमकं प्रकरण काय 

काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी साताऱ्यात केलेल्या भाषणात कवी जवाहर राठोड यांची एक कविता वाचून दाखवली होती.या कवितेतून कवीने देवी-देवतांवर टीकात्मक भाष्य केलेलं आहे. दरम्यान , शरद पवारांनी वाचलेल्या  कवितेवरून सोशल मीडियावरून  त्यांच्यावर देखील प्रचंड रोष विरोधकांनी व्यक्त केला होता. पवारांच्या भाषणाचा निवडक भाग शेअर करून ही टीका केली गेली. त्याच प्रकरणावरून केतकीने ही पोस्ट शेअर केली आहे. याच कवितेचा संदर्भ घेत केतकीने वकली नितीन भावे अशा कथित व्यक्तीने पवारांविरोधात लिहलेली एक पोस्ट शेअर केली. यानंतर केतकीच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली. अनेक स्तरावरुन केतकीने केलेल्या या कृतीचा निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच राजकीय नेतेमंडळींनी देखील तिच्यावर सडेतोडपणे टीका करत तिच्याविरोधाक कारवाईची मागणी केली.

केतकी चितळे विरोधात आतापर्यंत महाराष्ट्रातील अनेक भागात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसचे राष्ट्रवादी तर्फे आंदोनल देखील केलं जातंय.


हे ही वाचा – केतकी चितळेला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी; ठाणे सत्र न्यायालयाचा निर्णय