केतकीनं वाढवली महाविकास आघाडीची चिंता, देशमुखांच्या विरोधातील अर्जामुळे मविआला टेन्शन

जामीन दिल्यास देशमुख फरार होतील. त्यांना शोधण्यासाठी महाराष्ट्र पोलीस सीबीआय आणि ईडीला सहकार्य करणार नाहीत. अनिल देशमुख मिळत नाही असा दावा केतकीने केला आहे. यामुळे देशमुखांची अडचण वाढली आहे.

Ketki chitale oppose anil deshmukh bel application for rajyasabha election
केतकीनं वाढवली महाविकास आघाडीची चिंता, देशमुखांच्या विरोधातील अर्जामुळे मविआला टेन्शन

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेमुळे केतकी चितळेला अटक करण्यात आली आहे. केतकी सध्या जेलमध्ये आहे. माझ्यावरील आरोप चुकीचे असल्याचे सांगत केतकीने जामीनासाठी अर्ज केला आहे. तर राज्यसभा निवडणुकीमध्ये देखील केतकीची एन्ट्री झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना राज्यसभेच्या निवडणुकीसाठी एक दिवसाचा जामीन देण्यात येऊ नये अन्यथा ते फरार होतील असा दावा केतकीने केला आहे. देशमुखांनी राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. याविरोधात केतकीने अर्ज दाखल केल्यामुळे महाविकास आघाडी सरकारचे देखील टेन्शन वाढलं आहे. (Ketki chitale oppose anil deshmukh bel application for Rajyasabha election)

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहनिर्माण मंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये वसुली करण्याचे आदेश दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. परंतु राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी जामीन देण्यात यावा असा अर्ज देशमुखांनी कोर्टात केला आहे. देशमुखांच्या जामीन अर्जाविरोधात आता केतकी चितळेने अर्ज केला असल्यामुळे चिंता वाढली आहे.

केतकी चितळे स्वतः जेलमध्ये आहे. तिने शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र देशमुखांच्याविरोधात अर्ज दाखल केला आहे. केतकीने देशमुखांच्याविरोधात केलेल्या अर्जात असे म्हटलं आहे की, देशमुखांनी एका दिवसासाठी जामीन मागितला आहे. परंतु त्यांना जामीन देण्यात येऊ नये. जामीन दिल्यास ते फरार होतील. त्यांना शोधण्यासाठी महाराष्ट्र पोलीस सीबीआय आणि ईडीला सहकार्य करणार नाहीत. अनिल देशमुख मिळत नाही असा दावा केतकीने केला आहे. यामुळे देशमुखांची अडचण वाढली आहे.

ईडीचा देशमुख -मलिकांच्या अर्जाला विरोध

ईडीनेसुद्धा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जाला विरोध केला आहे. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी एक दिवसाचा जामीन देण्यात यावा अशी मागणी नवाब मलिक आणि देशमुखांनी केली आहे. परंतु कैद्यांना मतदानाचा अधिकार नसतो असे ईडीने म्हटलं आहे. तसेच त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा असे प्रतिज्ञापत्र ईडीने कोर्टात सादर केले आहे.


हेही वाचा : मी माफीचा साक्षीदार, आता नेमंक काय करायचं?, सचिन वाझेंचा कोर्टात प्रश्न