घरमहाराष्ट्रKhadse Vs Mahajan : 'या' कारणामुळे एकनाथ खडसेंच्या मालमत्तेचा होऊ शकतो लिलाव;...

Khadse Vs Mahajan : ‘या’ कारणामुळे एकनाथ खडसेंच्या मालमत्तेचा होऊ शकतो लिलाव; गिरीश महाजनांची माहिती

Subscribe

एकनाथ खडसे हे नेहमीच भ्रष्टाचाराबद्दल बोलत असतात. पण खडसे हेच भ्रष्टाचाराचे कुलगुरू आहेत, अशी टीका मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे.

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन या दोन्ही नेत्यांमध्ये तूतू-मैंमैं सुरू असल्याचे महाराष्ट्राला माहिती आहे. अवैध गौण खनिज उत्खनन केल्या प्रकरणी एकनाथ खडसेंना 137 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या प्रकरणावरून गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर निशाणा साधला आहे. हा दंड वेळेत भरला नाही, तर एकनाथ खडसेंची संपूर्ण मालमत्ताचा लिलाव केला जाईल, अशी शक्यता गिरीश महाजन यांनी वर्तवली आहे.

गिरीश महाजन म्हणाले, “एकनाथ खडसेंनी कुटुंबीयांच्या नावे जमीन घेतली. यात मुरूम उत्खनन केले. पण खडसेंनी जमिनीची रॉयल्टी भरली नाही. हा कोट्यवधी रुपयांचा मुरूम विकला, खडसेंनी हा सर्व पैसा काळ्या मार्गाने घेतला असून याबाबत त्यांनी रॉयल्टी भरली असल्याचा एकही पुरावा त्यांच्याकडे नाही. यामुळे खडसेंना 137 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यापैकी खडसेंना 35 कोटी रुपयांचा दंड रुपये तातडीने भरावा लागणार आहे. जर खडसेंनी हा दंड वेळेत भरला नाही, तर त्यांची संपूर्ण मालमत्ता लिलावात काढली जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती गिरीश महाजनांनी दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Chakankar On Awhad : तेलघाले आव्हाड तुम्ही आता गप्पच बसा! चाकणकरांचा थेट हल्लाबोल

खडसेंमुळे जावई तुरुंगात गेला

एकनाथ खडसेंवर टीका करताना गिरीश महाजन म्हणाले, सत्तेत असलो की, आपले कोणीही वाकडे करू शकत नाही, या मानसिकतेचे हे उत्तम उदाहरण आहे. या गोष्टी खडसेंनी केल्या तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन कसे नालायक आहेत, हे सांगण्याचा प्रयत्न करत असतात. या कृत्यामुळे खडसेंचा जावई तुरुंगात जाऊन आला. खडसे हे नेहमीच भ्रष्टाचाराबद्दल बोलत असतात, पण खडसे हेच भ्रष्टाचाराचे कुलगुरू आहेत”, अशी टीका ही त्यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -