Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर उत्तर महाराष्ट्र खरेंचे खोटे कारनामे : सटाणा मर्चन्ट्स बँकेची प्रक्रियाही बेकायदेशीर

खरेंचे खोटे कारनामे : सटाणा मर्चन्ट्स बँकेची प्रक्रियाही बेकायदेशीर

Subscribe

जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांच्या लाचखोरीची चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून झडत होती. परंतु, त्यांचे हात एवढ्या वरपर्यंत पोहोचलेले होते की, त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नव्हती. आता मात्र खरेंचे खोटे कारनामे पुढे येत आहेत. या संदर्भात ‘आपलं महानगर’मध्ये बुधवार (दि. १७)पासून ‘खरेंचे खोटे कारनामे’ ही वृत्त मालिका सुरु झाली आहे. खरेंच्या कारनाम्यांसदर्भात पुराव्यांसह माहिती असल्यास ९९७५५४७६१६ या क्रमांकावर संपर्क साधावा. माहिती देणार्‍याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.

नाशिक : राजलक्ष्मी सहकारी बँकेच्या पाठोपाठ सटाणा मर्चंन्ट्स बँकेची निवडणूक प्रक्रिया देखील बेकायदेशीर आणि नियमबाह्य पद्धतीने राबविल्या प्रकरणी लाचखोर तत्कालीन उपनिबंधक सतीश खरे याच्या विरोधात थेट न्यायालयात दावा दाखल केला आहे. सतीश खरे याला निवडणुकीपासून लांब ठेवण्याचे आदेश असताना देखील त्याने शासनाच्या आदेशाला न जुमानता सटाणा मर्चन्ट्स बँकेची निवडणूक प्रक्रिया बेकायदेशीरपणे राबविल्याने त्याच्याविरूद्ध कारवाई करण्याची मागणी बँकेचे सभासद मयूर अलई यांनी न्यायालयाकडे केली आहे.

नाशिक शहरातील राजलक्ष्मी बँकेची निवडणूक प्रक्रिया नियमबाह्य पद्धतीने बेकायदेशीरपणे राबवल्याची तक्रार झाल्यानंतर त्याला सहकारी संस्थांच्या निवडणुकीपासून लांब राहण्याचे आदेश मंत्रालयातून देण्यात आले होते. परंतु खरे मुळचा सटाणा तालुक्यातील रहिवासी असल्याने त्याला समकोत जास्तच ‘इंटरेस्ट’ होता. समको बँकेच्या निवडणुकीत त्याने पूर्णत: हस्तक्षेप करून विरोधी पक्षाच्या पॅनलला विजयाचा मार्ग मोकळा करून दिला. सहकारी संस्थांच्या निवडणुका बेकायदेशीर आणि नियमबाह्य पद्धतीने राबविण्यात हातखंडा असलेल्या खरेने समकोतही शासनाच्या आदेशाला न जुमानता मनमानी निर्णय दिले. समको बँकेतील आदर्श पॅनलचे अध्यक्ष श्रीधर कोठावदे हे खरेचे मित्र असल्यामुळे खरेने कोठावदे यांना निवडणूक जिंकण्यासाठी पूर्ण मदत केल्याचे अलई यांनी आपल्या दाव्यात म्हटले आहे.

- Advertisement -

या निवडणुकीत खरे याने त्याच्या मर्जीतील सुजय पोटे यांना निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्त केले. या दोघांनी संगनमताने आदर्श पॅनलला मदत होईल हा दृष्टीकोण समोर ठेवून निवडणूक प्रक्रिया राबविली. खरे आणि सुजय पोटे हे बेकायदेशीरपणे काम करत असल्याचा दावा करीत याबाबत मयूर अलई यांनी तक्रारी केल्या. मात्र या तक्रारींकडे खरेने दुर्लक्ष केले. विशेष बाब म्हणजे निवडणूक निर्णय अधिकारी सुजय पोटे यांच्या विरूद्ध अनेक खातेनिहाय चौकशा सुरू असून त्याचे निर्णय घेण्याचे अधिकार खरे याच्याकडेच होते. त्यामुळे खरे सांगेन त्या पद्धतीने पोटे यांनी निवडणूक प्रक्रिया राबविल्याचा आरोप अलई यांनी केला आहे.

या संस्थेची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया, मतदान, मतमोजणी पूर्णपणे अयोग्य, बेदायदेशीर आणि नियमबाह्य असून त्याचा परिणाम निवडणूक निकालावर झाला आहे. खरे याने अत्यंत भ्रष्ट मार्गाने निवडणूक प्रक्रिया राबविली असून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया बेकायदेशीर ठरवून सटाणा मर्चन्ट्स बँकेची निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी अलई यांनी केली आहे. अशा प्रकारे खरे याचे अनेक कारनामे समोर येत असून आपल्या पदाचा दुरोपयोग करून त्याने जिल्ह्यातील अनेक सहकारी बँकांचे निकाल चुकीच्या पद्धतीने दिले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात नवीन वाद निर्माण झाले असून, खरे याने राबविलेल्या सर्वच मतदान प्रक्रियेंची चौकशी वरिष्ठ पातळीवरून करण्याची मागणी होत आहे. (क्रमश:)

सटाणा मर्चंट बँकेच्या निवडणूकीत मी आदर्श पॅनलचा अध्यक्ष होतो. ही निवडणूक लोकशाही पद्धतीने आणि पारदर्शक झालेली आहे. खरे याला आम्ही कधीही भेटलो नाही. तसेच त्याच्याशी कुठलाही संबंध नाही. : श्रीधर कोठावदे, अध्यक्ष, आदर्श पॅनल, समको बँक 

लाच स्विकारणे हा गुन्हा आहे. कायदेशीर कामांसाठी कोणालाही पैसे देण्याची गरज नाही. तक्रारदारांनी ८८८८८००८०९ किंवा 1064 क्रमांकावर किंवा नाशिक कार्यालयात संपर्क साधून तक्रार करावी, तक्रारदाराची ओळख गोपनीय ठेवली जाईल. : शर्मिष्ठा वालावलकर, अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -