Eco friendly bappa Competition
घर उत्तर महाराष्ट्र खोदा पहाड निकला चुहा : राजमल लखीचंदमध्ये 1300 किलो सोन्याचा अंदाज; EDच्या...

खोदा पहाड निकला चुहा : राजमल लखीचंदमध्ये 1300 किलो सोन्याचा अंदाज; EDच्या हाती लागले 40 किलोच

Subscribe

राजमल लखीचंद ज्वेलर्सचे मालक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्यावरील ईडी कारवाईपाठी राजकीय दबाव असल्याची चर्चा आहे.

जळगाव : गुरूवारच्या मध्यरात्रीपासून राज्यातील जळगावमध्ये सुरू असलेल्या राजमल लखीचंद ज्वेलर्सवरील ईडीचा छापा चांगलाच चर्चिल्या जात आहे. ही कारवाई शरद पवारांच्या निकटवर्तीयांवर झाली असल्याने यामध्ये राजकारण असल्याचा संशय असतानाच ईडीने टाकलेल्या या छाप्यात तब्बल 1300 किलो सोन्याचे खबाड हाती लागणार असल्याचा अंदाज असतानाच ईडीच्या अधिकाऱ्यांना फक्त 40 किलो सोने हाती लागल्याने खोदा पहाड निकला छुहा अशी स्थिती झाल्याचे दिसून येत आहे.(Khoda Pahad Nikla Chuha 1300 kg gold estimate in Rajmal Lakhichand Only 40 kg was taken into the hands of ED)

राजमल लखीचंद ज्वेलर्सचे मालक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्यावरील ईडी कारवाईपाठी राजकीय दबाव असल्याची चर्चा आहे. ईश्वरलाल जैन हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार आणि पक्षाचे खजिनदार होते. त्यामुळे ईडीच्या या कारवाईचा संबंध शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील राजकीय वादाशी जोडला जात आहे.

काय मिळाले ईडीच्या पथकाला

- Advertisement -

राष्ट्रवादीचे माजी खासदार आणि शरद पवार यांचे निकटवर्तीय समजले जाणारे ईश्वरलाल जैन यांच्या मालकीच्या राजमल लखीचंद ज्वेलर्सवर छापा टाकण्यात आला होता. या कारवाई ईडीच्या पथकाकडून छापेमारी करण्यात आली. या कारवाई दरम्यान ईडीने तब्बल 1 कोटी रुपयांची रोकड आणि फक्त 39 किलो सोने-हिऱ्यांचे दागिने जप्त केले होते. या दागिन्यांची किंमत ही 25 कोटी रुपये ऐवढी आहे.

हेही वाचा : “किसी की मुस्कुराहटों पे हो निसार’; प्रियंका गांधींनी गीतातून वाहिली राजीव गांधींना आदरांजली

बॅंकेकडून कर्ज घेताना 1284 किलो सोन्याचा अंदाज

- Advertisement -

ईडीने राजमल लखीचंद ज्वेलर्सवर छापा टाकला तेव्हा सोन्याचा बरासचा साठा असल्याचा अंदाज होता. कारण, लखीचंद ज्वेलर्सने त्यांच्याकडे बँकेकडून कर्ज घेताना 1284 किलो सोन्याचे दागिने असल्याची माहिती जाहीर केली होती. मात्र, प्रत्यक्षात त्याठिकाणी केवळ 40 किलो सोन्याचेच दागिने सापडले. त्यामुळे बँकेकडून कर्जापोटी घेतलेल्या 353 कोटी खोटे खरेदी व्यवहार दाखवून इतरत्र वळवण्यात आले, असे ईडीच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा : ठाणे रुग्णालयातील मृत्यूच्या घटनेवरून अजित पवारांचे थेट मुख्यमंत्र्यांना सवाल

ईश्वरलाल जैन यांच्या अडचणी वाढणार

राजमल लखीचंद ज्वेलर्स, आर.एल. गोल्ड आणि मनराज ज्वेलर्स या तिन्ही कंपन्यांच्या प्रवर्तकांना बँकेकडून घेतलेल्या कर्जाचा विनियोग नेमका कुठे करण्यात आला, याबद्दल कोणतीही कागदपत्रे सादर करता आलेली नाहीत. त्यामुळे ईश्वरलाल जैन यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

- Advertisment -