Thursday, March 20, 2025
27 C
Mumbai
Homeमहाराष्ट्रKhokya Bhosale : खोक्या भोसलेला शिरुर कासार पोलिस ठाण्यात आणले; आज न्यायालयात हजर करणार

Khokya Bhosale : खोक्या भोसलेला शिरुर कासार पोलिस ठाण्यात आणले; आज न्यायालयात हजर करणार

Subscribe

छत्रपती संभाजीनगर – बीड पोलीस खोक्या उर्फ सतीश भोसले याला घेऊन छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचले आहे. आजपासून खोक्या भोसलेची खऱ्या अर्थाने चौकशी आणि कारवाईच्या दिशेने सुरुवात होणार आहे. आज (शुक्रवार) पहाटे 6.30 वाजाता खोक्याा घेऊन बीड पोलीस छत्रपती संभाजीनगच्या चिकलठाणा विमानतळावर उतरले. संभाजीनगरहून रस्ते मार्गाने त्याला शिरुर कासार पोलिस ठाण्या आणण्यात आले आहे. आज त्याला कोर्टात हजर केले जाईल आणि त्याच्यावर कारवाईला सुरुवात होत आहे. शिरुर कासार पोलीस ठाण्यात त्याला आणण्यात आले असून सकाळी त्याला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले.

काही दिवसांपूर्वी खोक्या उर्फ सतीश भोसले याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये खोक्या भोसले एका व्यक्तीला अमानुष मारहाण करत होता. यानंतर काही दिवसांनी आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. मारहाणीचे हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खोक्या भोसलेचे पैशांची उधळण करणारे आणि कारमध्ये नोटांची बंडले फेकण्याचे व्हिडिओ समाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी समोर आणली. मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर खोक्या भोसले साधारण आठ दिवसांपूर्वी फरार झाला. त्याला उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथून अटक करण्यात आली.

खोक्या भोसले याला बीड पोलीस आज शिरुर कासार कोर्टात हजर करणार आहेत. कोर्टामध्ये त्याची कोठडी मागितली जाईल. यानंतर पुढील कारवाईला सुरुवात होईल. गुरुवारी उशिरा रात्री खोक्याला प्रयागराजहून मुंबई विमानतळावर आणण्यात आले. त्यानंतर बीड पोलीस त्याला चिकलठाणा विमानतळावर घेऊन आले.

हेही वाचा : CM Fadnavis : खोक्या असो की बोक्या – ठोक्या, सर्वांना ठोकणार; मुख्यमंत्र्यांचा गुन्हेगारांना स्पष्ट संदेश

खोक्या उर्फ सतीश भोसलेच्या घराची होळी

खोक्या उर्फ सतीश भोसले याच्या घरावर गुरुवारी वनविभागाने धडक कारवाई करत बुलडोझर लावून त्याचे घर जमीनदोस्त करण्यात आले. वनजमीनीवर अतिक्रमण करुन घर आणि ऑफिस बांधण्यात आले असल्याचा आरोप वनविभागाने केला होता. वनविभागाने घर जमीनदोस्त केल्यानंतर संतप्त जमावाने रात्री त्याच्या घराच्या ढिगाऱ्याला आणि सामानाला आग लावली. होळीच्या दिवशी अज्ञातांनी त्याच्या घरातील लोकांना मारहाण करत घरातील जीवनावश्यक साहित्य पेटवून दिले.

कायद्याला कायद्याचे काम करु द्या – अंजली दमानिया 

खोक्या भोसलेच्या कुटुंबातील महिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया घराला आग लावून देण्याच्या प्रकाराच निषेध केला आहे. खोक्या भोसले याच्याव गुन्हा दाखल झाला आहे तेव्हा न्यायालय त्याला कायदेशीर शिक्षा देईल कोणीही कायदा हातात घेण्याची गरज नाही, असेही दमानिया यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : Khokya Bhosale : खोक्याला पकडलं उत्तर प्रदेशात अन् कारवाई देखील बुलडोझर बाबासारखीच