घरताज्या घडामोडीखोपोली पाली रोडच्या भीषण आगीत गोडाऊन खाक

खोपोली पाली रोडच्या भीषण आगीत गोडाऊन खाक

Subscribe

खोपोली पाली रोडवर उंबरे गावच्या हद्दीत असलेल्या ब्राईट ईव्हरमेट सोल्युशन कंपनीला लागलेल्या आगीमध्ये गोडाऊन पुर्णपणे जळुन खाक झाले. तर प्लांटचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सदर कंपनीच्या आवारातच कामगार राहत असल्याने आगीचे प्रमाण पाहता लवकरात लवकर आग आटोक्यात आणणे गरजेचे होते. खोपोली फायर ब्रिगेड टिम, प्रसोल केमिकल फायर ब्रिगेड टिम, गोदरेज कपंनीची फायर फायटिगं टिमने पाच तासाच्या अथक प्रयत्नानतंर आगीवर नियत्रंण मिळविले असले तरी गोडाऊन ला लागलेली आग मात्र धुमसत आहे. प्लॅस्टिकवर प्रक्रिया करणारे उद्योग असल्याने मोठ्या प्रमाणात आग पसरली. पण सुदैवाने या आगीत कोणतीही जिवितहानी झाली नाही.

कंपनीच्या जवळून गेल इंडिंयाची पाईप लाईन जात असल्याने गेल इंडियाची फायर फायटिगं टिम सह खालापुर पोलीसही घटनास्थळी उपस्थित होती. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्थेच्या टिमचे सदस्य असलेल्या केमीकल एक्सपर्ट धनजंय गीध सह गुरूनाथ साठीलकर, विजय भोसले, अमित गुजरे, अंकित साखरे, शैलेश आबंवणे, यतिन दळवी व अन्य सामाजिक कार्यकर्त्यांनीही मोलाची मदत केली.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -