घरमहाराष्ट्रखोरा बंदर वाहनतळाचे काम रखडले

खोरा बंदर वाहनतळाचे काम रखडले

Subscribe

मुरुड, सुप्रसिद्ध ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी खोरा बंदरातून प्रवास करता येतो. या ठिकाणाहून सुद्धा असंख्य पर्यटक रस्त्याच्या बाजूला आपले वाहन ठेऊन जंजिरा किल्ल्यावर जात असत. परंतु रस्त्यावर वाहन ठेवल्यामुळे जाण्यायेण्यासाठी पर्यटकांची मोठी कुचंबणा होत होती. यासाठी महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डाकडून खोरा बंदरात पर्यटकांची वाहन पार्किंग करता यावीत यासाठी मोठे वाहनतळ उभारण्यात आले होते. सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून या बंदराचा विकास करण्यात आला होता. परंतु ज्या ठेकेदाराने हे काम घेतले आहे त्याने मात्र वाहनतळाची काम पूर्ण न केल्याने हे काम रखडले आहे.

या वाहन तळाला फक्त संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. तसेच वाहनतळावर दगड अंथरण्यात आले असून यावर काँक्रीट होणे आवश्यक असताना ठेकेदाराने हे काम प्रलंबित ठेवल्याने पर्यटकांना या वाहनतळाचा उपयोग करता आलेला नाही. मे अखेरपर्यंत हे काम पूर्ण करणे आवश्यक होते. परंतु सदरचे काम कायम स्वरूपी थांबवण्यात आल्याचे दिसून येते. त्यामुळे सदरचे काम पूर्ण होणार की नाही हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डाचे मुरुड येथील बंदर निरीक्षक हितेंद्र बारापत्रे यांच्याशी भ्रमणध्वनी करून संपर्क साधला असता, सदरच्या कामाची मुदत १८ महिन्यांची आहे. वाहनतळावर दगड व माती टाकलेली असून ती एकरूप व्हावी यासाठी पाणी जिरणे खूप आवश्यक आहे. तातडीने जर काम केले असते तर काँक्रीटला तडे जाऊ शकतात. यासाठी पावसाळा संपताच तातडीने यावर काँक्रिट अंथरण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -