राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे या खुपते तिथे गुप्ते शोमध्ये सहभागी झाल्या आहेत. सध्या या शोचे अनेक प्रोमो आऊट होत आहेत. सुप्रिया सुळे यांनी या शोमध्ये अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. याशिवाय मनातल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी अवधुत गुप्तेने सुप्रिया सुळेंना कोण जास्त प्रभावी अजित पवार की देवेंद्र फडणवीस? असा प्रश्न विचारला. त्यावेळी सुप्रिया सुळेंनी क्षणात उत्तर दिलं. त्या नेमक्या काय म्हणाल्या ते पाहुया. (Khupate Tithe Gupte Ajit Pawar or Devendra Fadnavis who is effective deputy chief minister Supriya Sule gave the answer in a moment )
अवधूत गुप्ते यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना सुप्रिया सुळे यांनी क्षणाचाही विलंब न करता कोण जास्त प्रभावी उपमुख्यमंत्री यावर अर्थात अजित पवार असं उत्तर दिलं आहे. त्यानंतर अवधुत पुढे प्रश्न विचारतात की, कोणत्या पुतण्याचं काका विरोधात असलेलं बंड योग्य होतं असं वाटतं? त्याच्या ऑप्शनमध्ये राज ठाकरे, धनंजय मुंडे की अजित पवार.. मात्र, यावर सुप्रिया सुळे या काय उत्तर देतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अन् सुप्रिया सुळेंच्या डोळ्यांत पाणी आलं…
सुप्रिया सुळे खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात आल्यानंतर त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. यावेळी त्यांच्या डोळ्यात पाणी देखील आलं. एकवेळ कुटुंबातील माणसं साथ सोडतील, पण त्यांच्या आठवणी कधीच साथ सोडत नाहीत, अशी ओळ मागे ऐकायला येते. सुप्रिया सुळेंना अजितदादांचा फोटो दाखवण्यात येतो. यावेळी दादांचा फोटो पाहून सुप्रिया सुळेंच्या डोळ्यात पाणी येतं. हे बघून अवधूत गुप्ते म्हणतात, तुम्ही कार्यक्रमाच्या आधी आम्हाला म्हणाला होता, की मी कोणासमोर भावना उघड करू शकत नाही, पण आता… . खरंतर अजित पवार यांनी बंड केल्यानंतर पहिल्यांदाच असं सुप्रिया सुळे व्यक्त होताला पाहायला मिळाल्या.
https://www.instagram.com/reel/CxCtWiOvfpF/?utm_source=ig_embed&ig_rid=a28ff83a-2336-4d18-9bed-f79afa0f9544
(हेही वाचा: दळभद्री राजकाराणाचे नवेच प्रकरण…, संसद अधिवेशनावरून ठाकरे गटाचे टीकास्त्र )
या मान्यवरांनी लावलीय हजेरी
या कार्यक्रमात हजेरी लावणाऱ्या पाहुण्यांविषयी बोलायचं झालं तर राज ठाकरे, नारायण राणे, संजय राऊत, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी हे राजकारणी होते. तर सेलिब्रिटींमध्ये श्रेयस तळपदे, अमृता खानविलकर, सई ताम्हणकर, सुबोध भावे, जितेंद्र जोशी, अमोल कोल्हे, बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले अशा अनेक दिग्गजांनी हजेरी लावली आहे. तर, आगामी भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या दिसणार आहेत.