घरताज्या घडामोडीखून करा नाहीतर तुरुंगात टाका; संजय राऊतांचे शिंदे-फडणवीस सरकारला आव्हान

खून करा नाहीतर तुरुंगात टाका; संजय राऊतांचे शिंदे-फडणवीस सरकारला आव्हान

Subscribe

'तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही. खून करा नाहीतर तुरुंगात टाका', अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे फडणवीस सरकारला इशारा दिली आहे. '२०२४ पर्यंत संजय राऊत पुन्हा जेलमध्ये जाणार', असे विधान राज्याचे शालेय शिक्षणमंत्री व शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर यांनी केले होते.

‘तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही. खून करा नाहीतर तुरुंगात टाका’, अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे फडणवीस सरकारला इशारा दिली आहे. ‘२०२४ पर्यंत संजय राऊत पुन्हा जेलमध्ये जाणार’, असे विधान राज्याचे शालेय शिक्षणमंत्री व शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर यांनी केले होते. त्या विधानाला प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी ‘दीपक केसरकर जर खरंच असं बोलले असतील तर २०२४ साली त्यांनीही तुरुंगात जाण्याची तयारी ठेवावी, सगळं तयार आहे ‘, असे म्हटले. त्यानंतर आता ट्वीट करत राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला इशारा दिला आहे. त्यामुळे आता शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील वाद आणखीनच चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Kill or be imprisoned Sanjay Raut challenge to the Shinde Fadnavis government on Deepak kesarkar)

दीपक केसरकरांच्या वक्तव्याला माध्यमांशी बोलताना प्रत्युत्तर दिल्यानंतर संजय राऊत यांनी ट्विट करत राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला इशारा दिला आहे. “संजय राऊत यांना पुन्हा तुरुंगात टाकण्याची धमकी शिंदे गटाचे मंत्री केसरकर यांनी दिली. याचा अर्थ काय? न्याय व कायदा तुमच्या कोठीवर नाचत आहे? खोके देऊन त्यांना गुलाम केले आहे? हुकूमशाहीचा अंत होईल. तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही. खून करा नाहीतर तुरुंगात टाका”, अशा शब्दांत संजय राऊत सरकारला इशारा दिला. तसेच, या प्रकरणात देशाचे गृहमंत्री अमित शाहा यांनाही लक्ष्य घालण्याची मागणी राऊतांनी केली.

- Advertisement -

बुधवारी सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर यांना प्रत्युत्तर दिले. “आमच्या पक्षासाठी, महाराष्ट्रासाठी आम्ही तरुंगात जाऊ, आम्ही तरुंगात जाण्यासाठी तयार आहोत, आम्ही तुमच्यासारखे पळकुटे नाहीत. आम्ही तुमच्यासारखे लफंगेपण नाहीत. केसरकर म्हणजे न्यायालयात नाहीत, आणि ते कायदा नाही. दीपक केसरकर जर खरंच असं बोलले असतील तर २०२४ साली त्यांनीही तुरुंगात जाण्याची तयारी ठेवावी, सगळे तयार आहे”, असे संजय राऊत यांनी म्हटले.


हेही वाचा – शिवशक्ती-भीमशक्ती महाराष्ट्राची ताकद, देशात परिवर्तनाची नांदी; संजय राऊतांचा दावा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -