घरक्राइमजुन्या वादातून यवतमाळमध्ये शिवसैनिकाची हत्या; जिल्हाभर तणावाचे वातावरण

जुन्या वादातून यवतमाळमध्ये शिवसैनिकाची हत्या; जिल्हाभर तणावाचे वातावरण

Subscribe

बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतीदिन. एकीकडे राज्यभरातील शिवसैनिक बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर आदरांजली वाहण्यासाठी येत असताना दुसरीकडे मात्र, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला 16 नोव्हेंबर रोजी विदर्भातील यवतमाळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे

यवतमाळ : बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला यवतमाळ शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. जुन्या वादातून एकावर चाकूने वार करून हत्या करण्यात आली असून, यामुळे यवतमाळ शहरासह जिल्हाभर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा तपास पोलीस करीत आहेत.(Killing of Shiv Sainik in Yavatmal due to old dispute An atmosphere of tension throughout the district)

बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतीदिन. एकीकडे राज्यभरातील शिवसैनिक बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर आदरांजली वाहण्यासाठी येत असताना दुसरीकडे मात्र, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला 16 नोव्हेंबर रोजी विदर्भातील यवतमाळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये शहरालगतच्या वाघाडी जांब येथे शिवसैनिकाची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. योगेश नरहरी काटपेलवार असे मृत शिवसैनिकाचे नाव आहे. जुन्या वादातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला असून, पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत. या घटनेमुळे यवतमाळ शहर आणि जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : शिवाजीपार्क परिसराला छावणीचे स्वरूप, राज्यभरातून शिवसैनिक शिवतीर्थवर दाखल

संशयीत महिलेला पोलिसांनी घेतले ताब्यात

योगेशन नरहरी काटपेलवार या शिवसैनिकाची हत्या झाल्यानंतर गुरुवारी यवतळमाळ शहर आणि परिसरात खळबळ उडालेली असताना दुसरी पोलीसही अलर्टमोडवर आले. त्यांनी या घटनेचे गांभीर्य ओळखत तत्काळ तपास हाती घेत मारेकऱ्याची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली, तर यावेळी घटनास्थळी असलेल्या एका संशयितासह महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, सध्या त्यांची कसून चौकशी केली जात आहे. याप्रकरणी आता कोणता खुलासा होतो याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : “बाळासाहेबांचा ‘मातोश्री’ बंगला स्मारक म्हणून जनतेसाठी खुला करावा”; भाजपची मागणी

हत्येमागील कारणाचा शोध सुरू

घटनेची माहिती मिळताच एसडीपीओ संजय पुज्जलवार, ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश तुनणकलवार, सहाय्यक निरीक्षक राहुल शेजव आदींना भेट देऊन तपास सुरू केला आहे. ही हत्या जुन्या वादातून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केल्या जात असून, अद्याप मात्र हत्येमागील मूळ कारण, पुढे आले नसल्याची स्थिती आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -