घर ताज्या घडामोडी आदित्य ठाकरेंना धक्का : किरण दिघावकरांची दीड महिन्यांत दोनदा तर मृदुला अंडेंची...

आदित्य ठाकरेंना धक्का : किरण दिघावकरांची दीड महिन्यांत दोनदा तर मृदुला अंडेंची तीनदा बदली

Subscribe

मुंबई : राज्यात शिंदे – फडणवीस सरकार आल्यानंतर त्यांनी आधीच्या महाविकास आघाडी सरकारला एकापाठोपाठ एक धक्के देण्यास सुरुवात केली आहे. आधीच्या ठाकरे सरकारचे अनेक निर्णयांना स्थगिती दिली असून मर्जीतील अधिकाऱ्यांची बदली केली जात आहे. शिवसेनेचे नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मर्जीतील किरण दिघावकर यांची अवघ्या दीड महिन्यात दुसऱ्यांदा बदली करण्यात आली आहे. त्यांच्याबरोबर मृदुला अंडे यांची तिसऱ्यांदा बदली करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी राज्यात राजकीय भूकंप झाला. त्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मूळ शिवसेनेचे नेतृत्व सांभाळणारे तत्कालीन मुख्यमंत्री व सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फारकत घेऊन एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करीत ३९ आमदारांना सेनेतून फोडले. त्यामुळे त्यावेळी सत्तेवर असलेले उद्धव ठाकरे यांना सरकार अल्पमतात आल्याने मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. महाविकास आघाडीच्या सरकारला सत्तेवरून पायउतार व्हावे लागले. शिंदे गटाने माजी मुख्यमंत्री भाजपचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी हातमिळवणी करीत राज्यात भाजपसोबत युतीचे सरकार स्थापन केले.

- Advertisement -

शिंदे सरकारचा कारभार सुरू झाल्यावर अवघ्या काही दिवसातच माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या खास मर्जीतील साहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांची व आणखीन दोन अधिकाऱ्यांची तात्काळ उचलबांगडी करण्यात आली आहे.
किरण दिघावकर यांची, जी/ उत्तर विभागाच्या सहाय्यक आयुक्त पदावरून उचलबांगडी करून त्यांची ‘ई’ वार्ड भायखळा येथे ४ जुलै रोजी बदली करण्यात आली होती. तर त्यांच्या जागेवर के/ पूर्व वार्डचे सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांची नेमणूक करण्यात आली. त्यावेळी, किरण दिघावकर यांनी, प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात आल्याचे सांगितले. मात्र कारण वेगळेच असल्याचे त्यावेळी बोलले जात होते.

आता पुन्हा एकदा म्हणजे १२ ऑगस्ट रोजी किरण दिघावकर यांची साहाय्यक आयुक्त ‘ई’ विभाग या पदावरून उचलबांगडी करून त्यांना साहाय्यक आयुक्त पी/ उत्तर विभाग या ठिकाणी पाठविण्यात आले आहे. त्यांच्या सोबतच एफ/दक्षिण साहाय्यक आयुक्त स्वप्नजा क्षिरसागर यांची ‘ए’ विभाग साहाय्यक आयुक्तपदी, तर पी/ उत्तर साहाय्यक आयुक्त महेश पाटील यांची एफ/ दक्षिण विभाग साहाय्यक आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तसेच, अजय कुमार यादव, कार्यकारी अभियंता ( परिवहन) यांच्याकडे साहाय्यक आयुक्त ‘ई’ विभाग यांचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.

- Advertisement -

साहाय्यक आयुक्त मृदुला अंडे यांची तिसऱ्यांदा बदली

एम/पश्चिम साहाय्यक आयुक्त मृदुला अंडे यांची साहाय्यक आयुक्त अतिक्रमण निर्मूलन ( शहर,पश्चिम उपनगर व पूर्व उपनगर) या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. वास्तविक, मृदुला अंडे यांचीही तिसऱ्यांदा बदली करण्यात आली आहे. एम/ पश्चिम साहाय्यक आयुक्त पदी नेमणूक होण्यापूर्वो त्या ‘एन’ विभागच्या साहाय्यक आयुक्तपदी कार्यरत होत्या. त्याहीपूर्वी म्हणजे त्या ‘आर/उत्तर विभाग साहाय्यक आयुक्त पदावर कार्यरत असताना त्यांची १४ जुलै रोजी एन विभाग साहाय्यक आयुक्त पदावर बदली करण्यात आली होती.


हेही वाचा : राज्यात १ हजार १८९ कोरोना बाधितांची नोंद, तर एका रुग्णाचा मृत्यू


 

- Advertisment -