घरमहाराष्ट्रKiran Mane: मुख्यमंत्र्यांचा उल्लेख करत किरण माने म्हणाले, भाषण करताना एक चिठ्ठी...

Kiran Mane: मुख्यमंत्र्यांचा उल्लेख करत किरण माने म्हणाले, भाषण करताना एक चिठ्ठी आली अन्…

Subscribe

किरण माने आपल्या मालिका, सिनेमांप्रमाणेच सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतात. बरेचदा या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले विचार, आपली मतं लोकांसमोर मांडतात.

मुंबई: किरण माने आपल्या मालिका, सिनेमांप्रमाणेच सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतात. बरेचदा या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले विचार, आपली मतं लोकांसमोर मांडतात. किरण माने यांनी नुकतीच एक फेसबुकवर पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख करत टीकास्त्र डागलं आहे. किरण माने यांनी यावेळी भाषणादरम्यान आपल्याला एक चिठ्ठी आल्याचं सांगत, विद्रोही साहित्य संमेलनाच्यावेळी झालेल्या एका प्रसंगाबद्दल सांगितलं आहे. (Kiran Mane Referring to the Chief Minister Eknath Shinde Kiran Mane said while speaking a note came and …)

नेमकं काय म्हणाले किरण माने? 

किरण माने यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, विद्रोही साहित्य संमेलनाच्या समारोपाचा प्रमुख पाहुणा म्हणून अंमळनेरला केलेलं कालचं भाषण हा माझ्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव होता. अक्षरश: वाक्यावाक्याला टाळ्या वाहवा भरभरून दाद. समारोपानंतर मला भेटायला, सेल्फीसाठी झालेली तुडूंब गर्दी चाहत्यांनी माझे काढलेले हजारो फोटोज आणि शेवटी जल्लोष करत मला खांद्यावर घेऊन अक्षरश: अर्धा तास नाचणारे माझे बहुजन बांधव.

- Advertisement -

सगळं आयुष्यभर काळजाच्या कप्प्यात जपून ठेवावं असं. प्रत्येक कलाकाराची इच्छा असते आपण लोकप्रिय व्हावं. लोकांचा ‘आवडता’ व्हावं. मला या गोष्टी या दोन वर्षांत भरभरून मिळाल्या. माझ्यावर जीव लावणारे, मनापासून प्रेम करणारे लाख्खो लोक महाराष्ट्रभरात आहेत. रोज महाराष्ट्रभरातल्या वेगवेगळ्या गांवातनं वेगवेगळ्या समारंभासाठी निमंत्रण घेऊन मला किमान पंचवीस फोन्स येतात. प्रत्येक ठिकाणी नाही जाऊ शकत मी. पण जिथे जाईन तिथे हजारोंच्या संख्येनं लोक आलेले असतात. प्रत्येकाला मला आपुलकीनं पर्सनली भेटायचं असतं. हे सगळं पाहून मन भरून येतं. कुणी कितीही बदनाम करायचा प्रयत्न करूदेत, चांगुलपणाचा आणि प्रामाणिकपणाचा विजय होतो यावरचा विश्वास दृढ होतो!

काल माझं भाषण सुरू करताना माझ्या पोडीयमवर एक चिठ्ठी आली. त्यावर लिहीलं होतं, ‘आत्ता अखिल भारतीय साहित्य संमेलनात मुख्यमंत्री येणार होते. तिथे अक्षरश: मंडप रिकामा होता. मुख्यमंत्र्यांनी दौरा कॅन्सल केला.’ असो. ते फारसं महत्त्वाचं नाही. सगळ्यात लक्षात रहाण्यासारखा क्षण म्हणजे, जेव्हा मी फुले, शाहू, आंबेडकर हे एका दमात म्हणालो.. आणि म्हणालो, “हे मी एका श्वासात का म्हणालो? कारण ही त्रयी तोडायची नाही आपल्याला. आज मराठा ओबीसी दलित अशी फूट पाडली जातेय. ते कारस्थान यशस्वी नाही होऊ द्यायचं.” तेव्हा जो उत्स्फूर्तपणे टाळ्यांचा कडकडाट झाला, तो अद्भूत आनंद देणारा होता. प्रेक्षकांत सर्व जातींचे बहुजन बसले होते. द्वेष पसरवणार्‍या भवतालात लोकांना प्रेमाचा संदेश भावतो यासारखं सुख नाही. तुका म्हणे देवा… आज सफल झाली सेवा!

- Advertisement -

(हेही वाचा:  Asaduddin Owaisi : “ही तर आम्हाला धमकी…”, गोविंदगिरी महाराजांच्या वक्तव्याला ओवैसींचे प्रत्युत्तर)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -