घरमहाराष्ट्रज्येष्ठ साहित्यिक किरण नगरकर यांचे निधन

ज्येष्ठ साहित्यिक किरण नगरकर यांचे निधन

Subscribe

ज्येष्ठ साहित्यिक किरण नगरकर यांनी वयाच्या ७७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.

मानवी नातेसंबंधातील विविध आयाम, समाज आणि व्यक्ती यांच्यातील द्वंद, माणसाचा अंतरीचा संघर्ष, हिणकस राजकारण अशा सगळ्या बाबींचा आपल्या टोकदार लेखणीने अत्यंत धाडसाने धांडोळा घेणारे ज्येष्ठ लेखक साहित्यिक किरण नगरकर यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांनी वयाच्या ७७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. प्रकृती अस्वास्थामुळे नगरकर यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास मेंदूतील रक्तस्त्रावाने त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज, शुक्रवारी सकाळी दहानंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

किरण नगरकर यांच्याविषयी…

ज्यांच्या नाव आणि आडनावात अस्सल मराठीपण झिरपते आहे, अशा किरण नगरकरांची बहुतांश साहित्यनिर्मिती इंग्रजीतून झाली. याचे कारण त्या भाषेचे अवकाश त्यांना अधिक व्यापक वाटले असावे. ‘रावण अँड एडी’, ‘ककल्ड, गॉड्स लिटिल सोल्जर’,‘द एक्स्ट्रॉज’ या नगरकरांच्या एकाहून एक सरस इंग्रजी कादंबऱ्यांनी वाचकांचे कल्पना आणि अनुभवविश्व आणखी समृद्ध केले आहे. किरण नगरकर हे केवळ कादंबरीकार नाहीत, तर ते नाटककार आणि पटकथाकारही आहेत. ‘कबीराचे काय करायचे?’ आणि ‘बेडटाइम स्टोरी’ या दोन नाट्यकृती किरण नगरकरांच्या नावावर आहेत. ‘स्प्लिट वाइड ओपन’ या चित्रपटातून त्यांनी अभनियही केलेला आहे. किरण नगरकर यांनी लिहिलेल्या ‘सात सक्कं त्रेचाळीस’ या कादंबरीला ४० वर्षे पूर्ण होत आहेत. तसेच डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी लिहिलेल्या ‘कोसला’ या कादंबरीला पन्नास वर्षे पूर्ण झाली. त्या वेळी रामदास भटकळ यांच्या पॉप्युलर प्रकाशनाने ‘कोसला’ची सुवर्णमहोत्सवी आवृत्ती प्रसिद्ध केली होती. ‘कोसला’प्रमाणेच दर्जेदार असलेल्या ‘सात सक्कं त्रेचाळीस’ या कादंबरीचा प्रत्यक्ष खप पहिल्या आवृत्तीच्या वेळी कमी झाला असला तरी किरण नगरकरांच्या लेखनकृतीचे जाणकारांनी तोंडभरून कौतुक केले होते.

- Advertisement -

‘रावण अँड एडी’ ही त्यांची कादंबरीदेखील नंतर मराठीत अवतरली. माणसाचे जगणे हा केंद्रबिंदू आणि त्या जगण्यातील असहायता, नश्वरता याचे दर्शन घडवणे हा ‘सात सक्कं त्रेचाळीस’ या कादंबरीच्या कथानकाचा गाभा आहे. जीवनातील प्रत्येक रूप, अरूप, विरूपाचा शोध या कादंबरीतून घेण्यात आला आहे. ‘सात सक्कं त्रेचाळीस’च्या क्लासिक आवृत्तीला किरण नगरकर यांनी लिहिलेल्या विशेष मनोगतातून त्यांनी या कादंबरीबद्दल तसेच स्वत:च्या साहित्यप्रवासाबद्दलही थोडेसे विस्ताराने सांगितले आहे.


हेही वाचा – ‘लता मंगेशकरांनी गायिकांचे करियर उध्दवस्त केले’; नेटकरी संतापले!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -