घरमहाराष्ट्रकिरण पाटील यांच्यासह मराठवाड्यातील शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश

किरण पाटील यांच्यासह मराठवाड्यातील शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश

Subscribe

मुंबई :  संभाजीनगरच्या तिरुपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तसेच छत्रपती संभाजीनगर शहर काँग्रेसच्या सिडको हडको विभागाचे अध्यक्ष किरण नारायण पाटील यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील मराठवाड्यातील विविध प्रमुख कार्यकर्त्यांनी शुक्रवारी मुंबई येथे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुंबईत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.

सहकारमंत्री अतुल सावे, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर, प्रदेश सचिव मनोज पांगारकर, प्रदेश सचिव प्रवीण घुगे, प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर, भाजपा आ. अभिमन्यू पवार व नंदूरबार जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.

- Advertisement -

विनाअनुदानित शाळा कृती समितीचे अध्यक्ष व मुख्याध्यापक संघाचे तालुका अध्यक्ष लक्ष्मणराव जगताप यांच्यासह भगवानराव चाटे (मराठवाडा शिक्षक संघ, बीड), गजानन शिवाजीराव सूर्यवंशी (राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक, संभाजीनगर), वसंत मांगो राठोड (मुख्याध्यापक संघ, संभाजीनगर), समाधान देवजी पवार (संभाजीनगर शिक्षकसेना कार्याध्यक्ष), संभाजी साहेबराव भोसले (संभाजीनगर शिक्षकसेना अध्यक्ष), सुधाकर हरिभाऊ जोगदंड (संस्थापक अध्यक्ष, हिमालया एज्युकेशन ट्रस्ट, बीड), तानाजी खरात (काँग्रेस शिक्षक नेते, परभणी) आणि धनंजय व्यंकटराव शिंदे (मुख्याध्यापक संघ, बीड) यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.

चिखली येथील भाजपा आमदार श्वेता महाले यांच्या उपस्थितीत बुलढाणा जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. बुलढाण्याच्या जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्या संगिता पवार, शेलोडीचे सरपंच समाधान रेठे, शेलसूरचे सरपंच विजय धदर, करणखेडचे सरपंच गजानन गायकवाड, सरपंच स्वाती प्रमोद सपकाळ यांच्यासह माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी संचालक अशा विविध कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.


राज्यपाल नियुक्त 12 आमदारांवरून शिंदे-फडणवीस सरकारला सुप्रीम कोर्टाने फटकारले; सुनावणी नोव्हेंबरपर्यंत लांबली


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -