घरमहाराष्ट्रहिसाब तो लेकर रहेंगे; संजय पांडेंच्या ईडी चौकशीवरून सोमय्यांची प्रतिक्रिया

हिसाब तो लेकर रहेंगे; संजय पांडेंच्या ईडी चौकशीवरून सोमय्यांची प्रतिक्रिया

Subscribe

मुंबई : आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले असून त्यांना उद्या चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

संजय पांडे 30 जून रोजी मुंबई पोलीस आयुक्तपदावरून निवृत्त झाले होते. त्यानंतर लगेच तीन दिवसांत ईडीने त्यांना नोटीस पाठवली आहे. यावर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. ‘ठाकरे सरकारचे माफिया पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडी का बुलावा आया है, हिसाब तो लेकर रहेंगे,’ असे ट्वीट त्यांनी केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – शिंदे सरकारची आज बहुमत चाचणी; आमदारांच्या अपात्रतेवरून संघर्षाची शक्यता

चित्रा रामकृष्णन यांनी आनंद सुब्रमण्यम यांच्याशी संगनमताने शेअर बाजारात लिस्टेड असलेल्या अनेक कंपन्यांमध्ये आर्थिक गैरव्यवहार केला, असे सीबीआयच्या तपासात समोर आले आहे. या सर्व प्रकारात एक आयटी कंपनी माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे एनएसईचे लेखापरीक्षण करीत होती. ही कंपनी संजय पांडे यांची असल्याचा ईडीला संशय आहे. त्यामुळे हे समन्स बजावण्यात आल्याचे सांगण्यात येते.

- Advertisement -

याआधी शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने चौकशीसाठी पाचारण केले होते. तेव्हाही किरीट सोमय्या यांनी ‘हिसाब तो देना पडेगा,’ असे म्हटले होते. ‘तुम्ही मला, पत्नीला, मुलगा नीलला आणि आईला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता. आम्हाला धमक्या द्या, हल्ले करा, शिव्या द्या पण आता “हिसाब तो देना पडेगा,’ अशा आशयाचे ट्विट किरीट सोमय्या यांनी केले होते.

हेही वाचा – सर्वच लोकल एसी होणार? मुंबईकरांसाठी पंतप्रधान कार्यालयाकडून महत्त्वाचा आदेश

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -