अर्जुन खोतकर यांचा जमीन बळकावण्याचा प्रयत्न, किरीट सोमय्यांचा आरोप

अडीचशे कोटींची जमीन ही शेतकरी आणि राज्य सरकारची...

जी राज्य सरकारची १०० एकर जमीन आहे. ती सुद्धा बळकावण्याचा प्रयत्न अर्जुन खोतकर यांच्याकडून सुरू आहे. ज्या शेतकऱ्यांनी कारखान्यांसाठी जमीन दिलेली आहे. त्या जमिनीची किंमत बाजारात पाहिली असता १ हजार कोटींच्या आसपास आहे. अडीचशे कोटींची जमीन ही शेतकरी आणि राज्य सरकारची शंभर एकर आहे. परंतु तो साखर कारखाना सुरू झालाच नाही. त्यांच्या कामगारांचे पैसे सुद्धा अजून दिलेले नाहीयेत. परंतु त्याच्यावर कॉम्पलेक्स आणि बांधकाम करण्याचं षडयंत्र असल्याच्या तक्रारी अनेक शेतकऱ्यांनी माझ्याकडे दिल्या. त्यांनी ईडीपासून राज्य मंत्रालयाला सुद्धा दिल्या.

गेल्या आठवड्यात मी केंद्र सरकारचे जे सहकारी सचिव अग्रवाल यांच्याकडे पण तक्रार दाखल केली आहे. अर्जुन खोतकर यांचा १०० कोटींचा घोटाळा आणि १ हजार कोटींची शेतकऱ्यांची जमीन बळकावण्याचा प्रयत्न याचा तपास सुरू झाला आहे. यादेखील शेतकऱ्यांनी अनेक तक्रार माझ्याकडे दाखल केल्या आहेत.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या न्यायालयीने कोठडीमध्ये आहेत. त्यामु्ळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनिल देशमुख यांचं कौतुक करताना त्यांच्या पाठिशी राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचं म्हटलं आहे. शरद पवारांच्या आशीवार्दाने अनिल देशमुखांना पुन्हा एकदा गृहमंत्रीपदावर बसवणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले आहेत. तसेच याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.