घरमहाराष्ट्रहसन मुश्रीफ यांनी केला १२७ कोटींचा घोटाळा, किरीट सोमय्यांचा आरोप

हसन मुश्रीफ यांनी केला १२७ कोटींचा घोटाळा, किरीट सोमय्यांचा आरोप

Subscribe

राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मनी लाँड्रिंग, बेनामी संपत्ती गोळा करणे, तसेच इतर अनेक गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. मुश्रीफ यांनी प्रथमदर्शनी १२७ कोटींचा घोटाळा केल्याचे स्पष्ट झाले असून हा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचेही ते म्हणाले. मुश्रीफ यांनी आर्थिक गैरव्यवहार करून बेनामी मालमत्ता कशी जमवली याबाबत २७०० पानांचे पुरावे आपल्याकडे आहेत. हे सर्व पुरावे आपण आयकर विभागाकडे दिले असून ईडीकडेही मी हे सर्व पुरावे सादर करणार असल्याचेही किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर आणि नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आतापर्यंत आघाडीच्या एकूण ११ मंत्री आणि नेत्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यानंतर आपल्याकडे आणखी दोन मंत्र्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे असून त्यातील एका मंत्र्याचा घोटाळा आपण सोमवारी उघड करू, असे सोमय्या यांनी जाहीर केले होते. त्यानुसार सोमय्या यांनी सोमवारी सकाळी येथे पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे नाव जाहीर केले आहे.

या घोटाळ्यात केवळ ग्रामविकास मुश्रीफ यांचाच सहभाग नसून त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा सहभाग आहे. मुश्रीफ यांचे पुत्र नाविद मुश्रीफ आणि पत्नी साहिरा मुश्रीफ हेही या घोटाळ्यात सहभागी आहेत. मी महाविकास आघाडी सरकारमधील ११ भ्रष्टाचारी मंत्री आणि नेत्यांची नावे आतापर्यंत जाहीर केली होती. मात्र, या ११ जणांनंतर आता राखील खेळाडूंची नावे वाढत चालली आहेत. आज ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे नाव आम्ही वाढवत आहोत, हसन मुश्रीफ कुटुंबाने शेकडो कोटींचे घोटाळे केले आहेत. मुश्रीफ यांनी हे घोटाळे बोगस कंपन्या, शेल कंपन्यांच्या माध्यमातून केले आहेत, असे मुश्रीफ यांनी सांगितले.

- Advertisement -

सोमय्या पुढे म्हणाले की, सीआरएम सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत प्रवीण अग्रवाल हे ऑपरेटर आहेत. याच कंपनीतून हसन मुश्रीफ यांचे पुत्र नाविद मुश्रीफ यांनी दोन कोटींचे कर्ज घेतले असल्याचे दाखवले आहे. याच कंपनीवर सन २०१७ -१८ मध्ये प्रतिबंध लावण्यात आला होता. तेव्हा काहींवर कारवाई देखील सुरू झाली होती. याच कंपनीतून नाविद यांनी निवडणुकीसाठी फॉर्म भरला होता. सीआरएम कंपनीत २ कोटी ४५ लाख ३५४ इतकी रक्कम असल्याचे नाविद यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दाखवण्यात आले आहे. ही कंपनी शेल कंपनी असल्याचे सिद्ध झाले आहे.
ग्रामविकास मंत्री यांच्या भ्रष्टाचाराचे सर्व पुरावे आपल्याकडे असून उद्या मी हे सर्व पुरावे मुंबईतील ईडीच्या कार्यालयात सादर करून अधिकृत तक्रार देणार आहे. तसेच परवा दिल्लीला जाऊन अर्थ मंत्रालय आणि तेथील ईडीकडे मी हे सर्व पुरावे सादर करणार आहे, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -