घरताज्या घडामोडीवाशिम शिवसेनेचा हायवे कॉन्ट्रॅक्ट घोटाळा गडकरींच्या पत्रामुळे उघड, भाजपचा आरोप

वाशिम शिवसेनेचा हायवे कॉन्ट्रॅक्ट घोटाळा गडकरींच्या पत्रामुळे उघड, भाजपचा आरोप

Subscribe

वाशिम शिवसेनेचा नवा हायवे कॉन्ट्रॅक्ट घोटाळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्रामुळे उघड झाला आहे. असा आरोप भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी केला आहे. शिवसेनेच्या नियमबाह्य आणि दहशतीमुळे राज्यातील राष्ट्रीय महामार्गांची कामे बंद पडतील असा इशारा नितीन गडकरींनी पत्रातून दिला आहे. शिवसेना आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधींनी अधिकारी आणि कंत्राटदारांना भंडावून सोडलं आहे. नितीन गडकरींनी या प्रकरणात मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. गडकरींच्या स्फोटक पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी शिवसेनेवर पुन्हा एकदा आरोप केला आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांवर किरीट सोमैय्यांनी अनेक आरोप केले आहेत. यामध्ये काही आरोपांवर चौकशी देखील सुरु केली आहे. किरीट सोमैय्या यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्रावरुन वाशिम शिवसेनेवर हल्लाबोल करत घोटाळ्याचा आरोप केला आहे.

- Advertisement -

माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी म्हटलं आहे की, वाशिम शिवसेनाचा आता हायवे कॉन्ट्रॅक्ट घोटाळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्रामुळे बाहेर आला आहे. शिवसेना खासदार भावना गवळी आणि त्यांच्या सह्योगींचा १०० कोटींचा घोटाळा यापुर्वीच उघडकीस आला आहे. उच्च न्यायालयात याचिकाही दाखल झाली आहे. या सगळ्याची प्रत्यक्ष चौकशी करण्यासाठी मी स्वतः शुक्रवार २० ऑगस्टला वाशिम दौऱ्यावर असणार आहे. अशी माहिती भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी दिली आहे.

- Advertisement -

गडकरींची मुख्यमंत्र्याकडे तक्रार

केंद्राच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयातर्फे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय महामार्गावरील प्रकल्प मंजूर करण्यात आलेले आहेत. त्यापैकी बरेच प्रकल्प पूर्णत्वास आलेले असून काही प्रगतीपथावर आहेत. मात्र अनेक प्रकल्पांच्या कामांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी अडचणी आणत असल्याचे माझ्या निदर्शनास आलेले आहे. विविध प्रकारच्या नियमबाह्य मागण्यांनी अधिकारी व कंत्राटदारांना भंडावून सोडणे व त्यांनी न ऐकल्यास कार्यकर्त्यांना चिथावणी देऊन काम बंद पाडण्यापर्यंत या लोकप्रतिनिधींची मजल गेली आहे. विशेषत: विशेषतः वाशिम जिल्ह्यात हे प्रामुख्याने घडते अहे. असे नितीन गडकरी यांनी पत्रात म्हटलं आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -