घरमहाराष्ट्रपगार ७० हजार अन् मालमत्ता ७५० कोटी; बजरंग खरमाटेंवर सोमय्यांचा आरोप

पगार ७० हजार अन् मालमत्ता ७५० कोटी; बजरंग खरमाटेंवर सोमय्यांचा आरोप

Subscribe

आरटीओ अधिकारी बजरंग खरमाटे यांच्याकडे तब्बल ७५० कोटींची मालमत्ता असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या आज सांगलीला खरमाटे यांच्या संपत्तीची पाहणी करायला गेले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, बजरंग खरमाटे हे चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत.

किरीट सोमय्या यांनी आज सांगली येथे जाऊन खरमाटे यांच्या संपत्तीची पाहणी केली. बजरंग खरमाटे यांची अफाट संपत्ती आहे. जमीनी, बांधकाम ठेकेदार, कारखाने आदींची बाजारभाव किंमत ७५० कोटींची संपत्ती आहे. ७० हजार पगार आणि ७५० कोटींची संपत्ती कशी? असा सवाल सोमय्या यांनी केला. एक आरटीओ अधिकारी एवढे पैसे कुठून कमवू शकतो? यातूनच ही संपत्ती बेनामी असल्याचं दिसून येतं असं सोमय्या म्हणाले. तसंच सोमय्या यांनी तासगाव इथल्या खरमाटे यांच्या आलिशान बंगल्यातसमोर गेले आणि तिथं त्यांनी या बंगल्यासोबत सेल्फी काढला.

- Advertisement -

आरटीओ अधिकारी बजरंग खरमाटे हे राज्याचे परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांचे निकटवर्तीय मानले जातात. दरम्यान, सोमय्या यांनी खरमाटे यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे अनिल परब यांच्या अडचणी वाढणार, असल्याचं बोललं जातं.

- Advertisement -

हेही वाचा – अनिल परबांच्या अडचणी वाढणार?, बजरंग खरमाटे चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -